स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवा निमित्त विद्यार्थ्यांसाठी मैत्रा फाउंडेशन कडून विविध स्पर्धांचे आयोजन.

बीड प्रतिनिधी- मैत्रा फउंडेशन या संस्थेमार्फत भारतीय स्वातंत्र्याला ७५ वर्षे पूर्ण होत आहेत, ह्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त शालेय विद्यार्थ्यांसाठी विविध स्पर्धांचे आयोजन केलेले आहे. सदरील स्पर्धा ही लहान गट इ.१ली ते ७ वी व मोठा गट इ.८वी ते १०वी या दोन गटात विभागलेली आहे. शालेय विद्यार्थ्यांसाठी निबंध स्पर्धा,चित्रकला स्पर्धा,वक्तृत्व स्पर्धा व देशभक्ती गीतगायन स्पर्धा इत्यादी स्पर्धांचे आयोजन करण्यात आलेले आहे. स्पर्धेमध्ये शहरी, ग्रामीण भागातील सर्व विद्यार्थी सहभागी होऊ शकतात. स्पर्धेसाठी प्राथमिक व माध्यमिक असे दोन गट तयार करण्यात आलेले आहेत . या दोन गटांमध्ये वरील स्पर्धांचे आयोजन करण्यात आलेले आहे. सदरील स्पर्धा ही दिनांक १४ ऑगस्ट २०२२ या दिवशी होईल. स्पर्धेचे ठिकाण हे नंतर कळविण्यात येईल. तरी स्पर्धेत सहभागी होऊ इच्छिणाऱ्या शाळांनी व विद्यार्थ्यांनी आपली नोंदणी पुढील क्रमांकावर करावी असे मैत्रा फाउंडेशन चे संस्थापक अध्यक्ष द.ल.वारे यांनी कळविले आहे.ज्या विद्यार्थ्यांना ,शाळांना स्पर्धेत सहभागी व्हायचे आहे त्यांनी द.ल.वारे -९५४५७७७३४५,संजय राठोड -९२८४४७३१००,उद्धव बडे- ९४०४७५४५६८ ह्या क्रमांकावर संपर्क साधावा. व्हॉट्स ॲप ग्रुप द्वारे सर्वांना वेळोवेळी माहिती दिल्या जाईल.

स्पर्धा पूर्णतः निःशुल्क राहील.

स्पर्धेचे विषय -निबंध स्पर्धा १) प्राथमिक गट भारताच्या विविधतेतील एकता२) माध्यमिक गट भारतीय स्वातंत्र्यालढ्यात मवाळ आणि जहाल गटांचे योगदान.

चित्रकला स्पर्धा १)प्राथमिक गट -हर घर तिरंगा २)माध्यमिक गट - ७५ वर्षातील भारताची प्रगती 

देशभक्ती गीत गायन स्पर्धा -१) फक्त तीन कडवे

वक्तृत्व स्पर्धा -

सर्वांसाठी - १९४७ ते