इफ्तार पार्टीतून एकात्मता सामाजिक सलोख्याचे दर्शन होते.
पाचोङ येथील इफ्तार पार्टीत पालकमंञी संदीपान भुमरे यांचे मार्गदर्शन
पाचोड/ पवित्र रमजान महिन्यामध्ये सर्वांनाच सुख-समृद्धी प्राप्त व्हावी तसेच समाजात शांतता प्रस्थापित करण्याकरिता तसेच देशातील सर्व धर्मीयांमध्ये सौहार्द प्राप्त होण्याकरता आपण सर्वांनीच एकत्र येऊन या पुढील काळात निश्चित प्रयत्न करायला हवेत रोजा ठेवणाऱ्या सर्व बांधवांना आत्मिक बळ प्राप्त व्हावे तसेच इफ्तार पार्टीतून एकात्मता सामाजिक सलोख्याचे दर्शन होते असे पालकमंञी संदीपान भुमरे यांनी बोलतांना सांगितले .
पवित्र रमजान महिन्याच्या अनुषंगाने पाचोड
येथे मुस्लिम समाजाच्या वतीने रविवारी ( १६
एप्रिल) रोजी इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी जिल्ह्याचे पालकमंत्री संदिपान भुमरे यांची प्रमुख उपस्थिती होती. पालकमंञी भुमरे यांनी सांगितले की, आयोजित इफ्तार पार्टीत सर्वधर्मीय नागरिक उपस्थित होत असल्याने येथे एकात्मता व सामाजिक सलोख्याचे दर्शन पहायला मिळाले. विचारांची देवाण घेवाण सह सामाजिक एकतेचा संदेश इफ्तार पार्टीतून मिळतो.