शिरुर दिनांक ( वार्ताहर ) जिजामाता महिला सहकारी बॅंकेच्या निवडणूकीत राजमाता जिजाउ पॅनेलने १३ पैकी १३ जागा जिंकून दणदणीत विजय संपादन केला आहे . शिरुर तालुक्यातील अनेक राजकिय मातब्बर या निवडणुकीत उतरल्याने बॅकेची निवडणुक चुरशीची झाली होती या निवडणूकीच्या निमित्ताने अनेक नवीन राजकिय समीकरणे निर्माण झाल्याने या निवडणुक निकालच्या आगामी तालुक्यातील विविध निवड्णुकींवर व राजकिय समीकरणावर काय परिणाम होणार याबाबतची चर्चा रंगु लागली आहे . राजमाता जिजाउ पॅनेलचे खालील उमेदवार विजयी झाले आहेत . शिरुरचे माजी उपनगराध्यक्ष जाकिरखान शहिदखान पठाण , जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या रेखा मंगलदास बांदल , बाजार समितीचे संचालक धैर्यशील मांढरे , माजी नगरसेविका व विद्यमान संचालिका सुरेखा संतोष शितोळे , माजी नगरसेविका मनिषा कालेवार , सुजाता जगताप , रत्नमाला म्हस्के , मंगला भोजने , प्रणिता पठारे , अशोक काकडे , पूजा वांजळे , सुनिता शितोळे , सुरेखा शेलार हे विजयी झाले उमेदवार विजयी झाल्याचे वृत्त समजताच गुलाल उधळुन व पेढे वाटुन आनंद साजरा करण्यात आला . जिजामाता बॅकेच्या पुणे शहरासह चाकण ,शिरुर , शिक्रापुर , मांडवगण फराटा आदी ठिकाणी शाखा आहेत . फोटो जिजामाता महिला सहकारी बॅकेचे विजयी उमेदवार निकाल जाहीर झाल्यावर आनंद व्यक्त करताना .