माजी जिल्हा प्रमुख अॅड.चंद्रकांत नवले यांनी केले बीड व गेवराई मतदार संघातुन ७२०० प्रतिज्ञापत्र दाखल

Sponsored

पटौदी इंटरप्राइजेज एवं अलगोजा रिसोर्ट - बूंदी

पटौदी इंटरप्राइजेज एवं अलगोजा रिसोर्ट कीऔर से बूंदी वासियों को दीपावली की हार्दिक बधाई व शुभकामनाएं

प्रतिनिधी | बीड

बीड जिल्ह्यातील शिवसेना राज्य कार्यकारिणीची बैठक माजी मंत्री आमदार उदय सामंत यांच्या निवासस्थानी शुक्रवार ५ ऑगस्ट २०२२ रोजी पार पडली. या बैठकीत शिंदे गटाचे बीडचे माजी शिवसेना जिल्हा प्रमुख अॅड. चंद्रकांत नवले यांनी बीड व गेवराई मतदार संघातील ७२०० प्रतिज्ञापत्र दाखल केले आहेत.

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सुचनेनुसार शिवसेना नेते रामदास कदम यांच्या मार्गदर्शनाखाली आणि शिवसेना सचिव संजय मोरे , शिवसेना सचिव किरण पावसकर, जोशी यांच्या उपस्थितीत माजी मंत्री आमदार उदय सांमत यांच्या निवासस्थानी बीड जिल्ह्यातील शिवसेना राज्य कार्यकारिणीची बैठक पार पडली.या बैठकीत शिवसेना वाढविण्यासाठी राज्यातील शेतकरी, कष्टकरी, विद्यार्थी, व्यापारी, नौकरदार यांच्या कल्याण करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे २० तास काम करत असल्याचे प्रतिपादन शिवसेना सचिव संजय मोरे यांनी केले . याप्रसंगी माजी राज्यमंत्री प्रा. सुरेश नवले, आमदार अर्जुनराव खोतकर, पंडितराव भुतेकर, माजी शिवसेना जिल्हाप्रमुख चंद्रकांत नवले, जिल्हा संघटक महिला आघाडी रत्नमाला मुंडे , महिला आघाडी जिल्हाप्रमुख चंद्रकला बांगर , जिल्हाप्रमुख सचिन मुळूक, जिल्हाप्रमुख, कुंडलीकराव खांडे, लातुरचे नगरसेवक सतिश देशमुख ,तालुका प्रमुख भरतराव जाधव पाटील आदी उपस्थीत होते.

ठळक मुद्दा-

लोकहिताची कामे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली करणार

 शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे, धर्मवीर आनंद दिघे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे ज्वलंत हिंदुत्ववादी विचार जिल्हातील तळागाळापर्यंत पोहचवणार असुन लोकहितोपयोगी योजनांची माहिती व सर्वसामान्य लोकांची कामे मुख्यमंत्री शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली लवकरात लवकर मार्गी लावू असे शिवसेनेचे माजी जिल्हा प्रमुख अॅड. चंद्रकांत नवले यांनी बैठकी प्रसंगी सांगीतले.