शिरुर ( वार्ताहर) :  भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३२ व्या जयंतीनिमित्त पद्मश्री डॉ सिंधुताई सपकाळ माईंच्या श्री. मनःशांती छात्रालय शिरूर येथील संस्थेत महामानव भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर व अनाथांच्या माई पद्मश्री डॉ सिंधुताई सपकाळ यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून प्रतिमा पुजन करुन अभिवादन करण्यात आले . या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी दहिसरचे  सहाय्यक पोलीस निरीक्षक  विजय गंगाधर रासकर  हे होते . याप्रसंगी  संस्थेतील समर्थ ढगे, साहिल सपकाळ, शिवा गायन, भव्य सपकाळ, आर्यन जगताप यांनी भाषणे केली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक दिनेश  लोखंडे व सूत्रसंचालन दृप डोळे यांनी केले. यावेळी कू.आर्यन व कू.आर्नेश विजय रासकर यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. . या कार्यक्रमासाठी श्री.गंगाधर रासकर, अलका रासकर, संजय रासकर, लता रासकर, कोमल लोखंडे, साधना हजारे, तेजस हजारे, अक्षय मेहेर, प्रसाद मेहेर,रेखा मेहेर , गणेश गायकवाड, रमेश जासूद त्याचप्रमाणे संस्थेचे व्यवस्थापक यश सपकाळ, मीनाक्षी लटांबळे, वैभव दहेकर, भाऊसाहेब मांडले, गणेश शानवारे आदी  उपस्थित होते.

फोटो ओळी 

भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त अभिवादन करण्यात आले .