शिरूर दिनांक (वार्ताहर) शिरूर शहरातील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यानात महात्मा जोतीबा फुले यांच्या पुतळा उभारण्यात येईल असे पालकमंत्री व राज्याचे उच्च तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी जाहीर केले. भारतरत्न डॉ. आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त शहरातील आंबेडकर उद्यानात आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात पाटील बोलत होते . यावेळी त्याच्या समवेत भाजपाचे जिल्हा अध्यक्ष गणेश भेगडे, भाजपा जिल्हा सरचिटणीस ॲड. धर्मेंद्र खांडरे, जिल्हा नियोजन समितीचे सदस्य राहुल बाबुराव पाचर्णे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समिती शिरूरचे अध्यक्ष विनोद भालेराव, माजी नगरसेविका माया गायकवाड, प्रमोद गायकवाड, शरद गायकवाड, अविनाश शिंदे, रमेश गायकवाड, मनोज गाडेकर, नीलेश जाधव आदी उपस्थित होते. पाटील म्हणाले की डॉ. आंबेडकर यांनी पुढील अनेक वर्षाच्या विचार करून राज्यघटना लिहिली. त्यांनी अनेक गोष्टीचा व्यापक विचार करून राज्य घटना लिहिली. डॉ. आंबेडकर यांनी शिक्षणाचे व प्रबोधनाचे महत्व समजावून अन्यायाचा विरोधात संघर्ष करण्यासाठी प्रेरित केल्याचे पाटील म्हणाले. शिरूर शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यानात महात्मा जोतीराव फुले यांच्या पूर्णाकृती पुतळा उभारण्यात येईल असे त्यानी जाहीर केले. त्याच बरोबर मागासवर्गीय बांधवासाठी गृहनिर्माण प्रकल्प मार्गी लावण्याचे आश्वासन ही त्यानी दिले. यावेळी डॉ. आंबेडकर जयंतीनिमित्त आयोजिक करण्यात आलेल्या राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेतील बक्षीस विजेत्याच्या सन्मान व बक्षीस वितरण पालकमंत्री पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक जयंती समितीचे अध्यक्ष विनोद भालेराव यांनी केले त्यात त्यांनी सांगितले की आंबेडकर उद्यानाची सीमाभिंत बांधण्यासाठी एक कोटी ६४ लाख रुपयेचा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. शहरात मागासवर्गीय व गरीब लोकांसाठी शासनाने गृहनिर्माण योजना राबवावी. त्याच बरोबर आंबेडकर उद्यानात महात्मा जोतीराव फुले यांच्या पूर्णाकृती पुतळा उभारण्यात यावा व लहान मुलांसाठी बालक्रीडांगण करण्यात यावे अश्या मागण्या त्यांनी केल्या. राहुल पाचर्णे, धर्मेंद्र खांडरे यांनीची मनोगते यावेळी झाली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रावसाहेब चक्रे यांनी केले.आभार माया गायकवाड यांनी मानले . फोटो ओळी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त अभिवादन करताना  पालकमंत्री चंद्रकांत पाटील.