आडूळमध्ये जुगार अड्यावर धाड;सात जुगारी अटकेत..
"पाचोड पोलिसांची धडाकेबाज कारवाई"
पाचोड;आडूळ ता.पैठण येथील भीमनागर भागातील एका व्यक्तीच्या घरात विद्युत बल्प लाऊन त्यांच्या उजेडात जुगार खेळणाऱ्या सात जणांना पाचोड पोलिसांनी छापा टाकून रंगेहात पकडले असून ही कारवाई शनिवारी रात्री आठवाजेच्या सुमारास घडली असुन एक लाख सत्याहत्तर हजार चारशे रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असुन पाचोड पोलिसांनी जुगाऱ्यांना अटक केली.
याविषयी पोलिसांनी दिलेली माहिती अशी की,आडूळ येथे दररोज रात्री वेळी काही जुगारी घरात विद्युत बल्प लाऊन तेथे झन्ना मन्ना नावाचा जुगार पैशावर खेळा जात असल्याची माहिती गोपनीय खबऱ्यामार्फत माहिती मिळाली असता पाचोड पोलिसांना असता तात्काळ आडूळच्या भिमनगर भागातील प्रवीण नाना बनकर यांच्या घराममध्ये काही लोक जुगार पैशावर खेळत होते त्याचवेळी पोलीस पथकाने छापा टाकला. यामध्ये जावेद युसूफ शेख (वय32) रा.आडूळ प्रवीण नाना बनकर (वय 39) रा.आडूळ शेख पशु शेख चांद (वय 37) रा.आडूळकृ ष्णा रामराव मापारी (वय 35) रा.राजापूर कृष्णा सर्जेराव मोगल (वय 46 )रा. निलाजगाव प्रकाश रामा अंगुरे (वय 58) रा.ब्राह्मणगाव विठ्ठल शंकर नाब्दे (वय 34) रा.राजापूर यांना जुगार खेळताना रंगेहाथ पकडले. त्यांच्याकडून जुगाराचे साहीत्य, रोख रक्कम व इतर चीजवस्तू असा एकुण एक लाख सत्याहत्तर हजार रूपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून ही कारवाई सहाय्यक पोलिस निरिक्षक गणेश सुरवसे,पोलिस उपनिरिक्षक सुशांत सुतळे,पो.काँ.नगनाथ केंद्रे,पोहेक.रवींद्र क्षीरसागर यांनी केली असून झन्ना मन्ना खेळणाऱ्या सातही जणांवर पाचोड पोलिस ठाण्यांत गुन्हा दाखल करण्यात आला असुन पुढील तपास सपोनि.जि.सुरवसे यांच्या मार्गदर्शनाखाली बीट जमादार जगनाथ उबाळे हे करीत आहे,