परळी (प्रतिनिधी) परळी शहरातील बरकत नगर भागाला लागून असलेली बौद्ध वस्ती भिमानगर या भागात अशी चिखलमय रस्ते आजही कायम आहेत त्यामुळे तेथील लहान मुले,वयोवृद्ध ,शाळकरी मुले यांना अडचणीचा सामना करावा लागतो आहे.परळीच्या युवराज यांनी या भागापर्यंत आपल्या विकासाची प्रभागातील फेरी पोहोचवण्याचे काम करावे व विकासापासून वंचित राहिलेल्या बौद्ध वस्तीला न्याय देण्याचे काम करावे.अन्यथा 15 ऑगस्ट स्वातंत्र्यदिनी वंचित बहुजन युवा आघाडी परळी च्या वतीने याच चिखलमय रस्त्यामध्ये बसून परळी नगरपरिषदेच्या निषेधार्थ एकदिवसीय लाक्षणीक उपोषण करून या बौद्ध वस्तीला जाणीवपूर्वक दुर्लक्ष करणाऱ्या परळी नगर परिषदेचा जाहीर निषेध व्यक्त करण्यात येईल असा कडक इशारा वंचित बहुजन युवा आघाडीचे शहराध्यक्ष प्रेम जगतकर यांनी दिला आहे.