भोगलवाडी सेवा सहकारी सोसायटी भाजपाच्या ताब्यात; चेअरमनपदी चांगदेव तिडके तर व्हा. चेअरमनपदी उत्तम रूपनर यांची निवड
धारुर प्रतिनिधी अर्जुन मुंडे-
तालूक्यातील भोगलवाडी सेवा सहकारी सोसायटी भाजपाचे ताब्यात पुन्हा आली असून या संस्थेच्या चेअरमन पदी चांगदेव तिडके तर व्हा .चेअरमनपदी उत्तम रूपनर यांची एकमताने निवड करण्यात आली. या निवडी नंतर कार्यकर्त्यानी आनंदउत्सव साजरा केला.
धारूर तालूक्यातील भोगलवाडी सेवा सहकारी सोसायटी अटीतटीचे निवडणूकीत भाजपाने ताब्यात ठेवण्यात यश मिळवले होते चेअरमन व व्हा चेअरमन निवडीसाठी नवनिर्वाचीत संचालकाची भोगलवाडी येथे सहायक निंबधक शिवराज नेहरकर निवडणूक अधिकारी यांचे उपस्थीतीत करण्यातआली यावेळी चांगदेव तिडके यांची चेअरमनपदी निवड करण्यात आली तर व्हा. चेअरमन पदी उत्तम रूपनर यांची निवड करण्यात आली सर्व संचालक उपस्थीत होते.
निवडीचे वेळी सर्व नवनिर्वाचीत संचालक व भाजपाचे माजी सभापती अर्जन तिडकेव सचिव अर्जुन मुंडे नवनिर्वाचीत संचालक उत्तम तिडके,ज्ञानेश्वर गोरे,पांडूरंग तिडके,पराजी हजारे ,विश्वनाथ तिडके,बाबाराय तिडके,निवृत्ती मुंडे ,भारत पंडीत,कमलताई तिडके,रूक्मिन ताई मुंडे ,भाजप नेते शिवाजी आप्पा मुंडे,मा.सरपंच तुकाराम तिडके,अशोक तीडके,बळीराम हजारे,अॕड.नवनाथ पंचाळ,महादेव तिडके व समस्थ गावकरी उपस्थीत होते. या निवडी नंतर भाजपाच्या कार्यकर्त्यानी आनंदउत्सव साजरा केला. या पदाधीकारी यांचे भाजप नेते रमेशराव आडसकर, धारूर चे माजी नगराध्यक्ष डाॕ स्वरूपसिंह हजारी,राजाभाउ मुंडे आदीनी त्यांचे अभिनंदन केले .