म्हाळसी गावच्या सरपंचपदी सौ. साधना जनार्दन खडसे यांची निवड झाल्याबद्दल माजी आमदार भाऊराव पाटील गोरेगावकर यांच्या हस्ते नवनिर्वाचित सरपंच सदस्य यांचा भव्य सत्कार करण्यात आला.

सेनगाव तालुक्यात मौजे म्हाळशी येथील ग्रामपंचायत निवडणुकीत सेवानिवृत प्राचार्य जनार्दन खडसे यांच्या नेतृत्वात ग्रामपंचायत निवडणूक लढली गेली होती.

 त्या वेळी सरपंच पदासाठी सर्व प्रथम मुस्लिम समाजातील महिला चाॅद बी शेरखान पठाण यांची सरपंच पदासाठी निवड करण्यात आली होती.चाॅद बी शेरखान पठाण यांनी म्हाळसी गाव विकासासाठी विविध योजनेच्या माध्यमातून विकास कामे केली होती.दि.31 मार्च रोजी पिठासन अधिकारी वैजनाथ खोडके यांच्या उपस्थितीत म्हाळशी गावच्या सरपंचपदी सौ. साधाना जनार्दन खडसे यांची निवड करण्यात आली असून दि 04 एप्रिल रोजी नवनिर्वाचित सरपंच, उपसरपंच, सदस्याचा माजी आमदार भाऊराव पाटील गोरेगावकर यांच्या निवासस्थानी भव्य सत्कार करण्यात आला होता.यावेळी माजी आमदार भाऊराव पाटील गोरेगावकर,

सेवानिवृत्त प्राचार्य जनार्दन खडसे,नवाज खाॅन पठाण गजु पाटील, रंगनाथ पाटील पहेनिकर,भैया देशमुख, गोरेगाव येथील तंटामुक्ती अध्यक्ष अमोल खिलारी, आदींची उपस्थिती होती.माजी प्राचार्य जनार्धन खडसे यांच्या पत्नी सौ साधना खडसे यांची सरपंच पदासाठी निवड झाल्याने एका शिक्षीत घराण्यातील महिला सरपंच असल्याने म्हाळशी गावच्या विकासाला चालना मिळणार असल्याचे बोललं जातं आहे.