जल जिवन मिशन योजना कामाची मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी केली पाहणी..
पाचोड विजय चिडे) पैठण तालुक्यातील मुरमा, लिबगाव दादेगाव, येथील जिल्हा परिषद ग्रामीण पाणीपुरवठा जलजीवन मिशन योजनेअंतर्गत सुरू असलेल्या हर घर नल हर घर जल पाणीपुरवठा काम व विविध योजनेच्या पेव्हर ब्लॉक, सिंमेट रस्ता, नाली बांधकाम, गावातंर्गत ड्रेनेज लाईन, नळकांडी पुल आदी कामांची जिल्हा परिषद छ्त्रपती संभाजीनगरचे मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मिना यांनी माहीती घेऊन पाहणी केली व समाधान व्यक्त केले. यावेळी सहाय्यक गटविकास अधिकारी राजेश कांबळे, बांधकाम विभागाचे उपअभियंता संभाजी असोले, पाणीपुरवठा विभागाचे उपअभियंता अशोक घुगे, पंचायत समितीचे कक्ष अधिकारी निकम, विस्तार अधिकारी दशरथ खराद, कनिष्ठ अभियंता के. एस.शिंदे,
भालचंद्र दाणेकर, मनिष पाटील, ओमर शेख, सौरव श्रीवास्तव, अविनाश चपडे, विजय वैष्णव, पुष्कर पाटील, निखील जाधव, स्वच्छ भारत मिशनचे संतोष जाधव, अनिता तायडे, अनिल हजारे, ग्रामसेवक राजू दिलवाले, मुरम्याच्या उपसरपंच उषा दिनकर मापारी, ग्रामपंचायत सदस्य गोपीचंद आहेर, गणेश नेमाने, मनीषा अक्षय लेंभे, सविता गणेश काटे, जगदीश बाबरे, निलेश चिडे तसेच दादेगावच्या सरपंच उषा हजारे, उपसरपंच सुरेश हजारे,महादेव हजारे, उद्धव हजारे, पाणीपुरवठा व स्वच्छता समिती सदस्या रेखाताई गव्हाणे, पुजा योगेश गव्हाणे, शितल रविंद्र गव्हाणे, शहाजीराव गव्हाणे, रत्नाकर गव्हाणे यांच्यासह पदाधिकारी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.