चेअरमनपदी भारतराव तवार तर व्हा.चेअरमन पदी सिंधुबाई सोनवणे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.

पाचोड(विजय चिडे) पैठण तालुक्यातील कडेठाण बुद्रुक येथील विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थांची निवडणूक घेण्यात आली. या निवडणुकीत १३ पैकी १३ सदस्य बिनविरोध निवडून आले होते. (दि.५) रोजी चेअरमन व व्हाईस चेअरमन पदाची निवडणूक घेण्यात आली.यावेळी सर्व नुमते चेअरमन व व्हाईस चेअरमन ची बिनविरोध निवड करण्यात आली.या वेळी चेअरमन पदी भारतराव बापूसाहेब तवार यांची बिनविरोध निवड करण्यात आली तर व्हाईस चेअरमन पदी सिंधुबाई संपत सोनवणे यांची बिनविरोध निवड करण्यात आली  यावेळी निर्वाचन अधिकारी म्हणून संतोष साठे व गट सचिव संतोष खरे  हे उपस्थित होते  कडेठाण बुद्रुक येथील सोसायटीवर पालकमंत्री संदिपान पाटील भुमरे व माजी जिल्हा परिषद  अर्थ व बांधकाम सभापती विलास बापू भुमरे यांनी आपले वर्चस्व कायम ठेवले आहे.                                         

यावेळी बिनविरोध निवडून आलेली नवनिर्वाचित संचालक अनिरुद्ध उत्तमराव तवार,उदयसिंह भैयासाहेब तवार,कालिदास सिताराम तवार,भारत बापूसाहेब तवार, संभाजी शिवाजीराव तवार,सुरेश आबासाहेब तवार,उमाबाई भागवत नाटकर,मुकुंद धर्मराज वीर, सिताराम मधु चव्हाण,सिंधुबाई संपत सोनवणे, मुक्ताबाई रतन चौरे,सुरेखा संजीवन तवार, मोहन बन्सीधर तवार हे सदस्य बिनविरोध निवडून आले आहेत. या सर्व सदस्यांचे पालकमंत्री संदिपान पाटील भुमरे व जिल्हा परिषद माजी अर्थ व बांधकाम सभापती विलास बापू भुमरे यांनी अभिनंदन केले. या निवडीचे वेळी माजी सरपंच अभिजीत तवार, सरपंच संभाजी तवार,उपसरपंच भूषण तवार, शालेय समिती अध्यक्ष विनोद कालिदास तवार ,आप्पासाहेब तवार, भागवत नाटकर, राजू सोनवणे,सोमनाथ तवार,संजीवन नाटकर, संजीवन तवार,कृष्णा पाटील,रमेश कुटेकर, विनोद तवार, किशोर तात्या तवार, अनिल चव्हाण, संजय चव्हाण,बिभीषण चव्हाण, बंडू चौरे, सुशील तवार, विजय आडे ,कांता टेलर, गणपत तवार,काका तवार,दिनेश चव्हाण, महेश तवार सह गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

      ्