पाचोडमध्ये महावीर जयंती उत्साहात साजरी.

पाचोड(विजय चिडे) जगाला 'जिओ और जिने दो'चा संदेश देणाऱ्या जैन धर्मियांचे चोविसावे तिर्थनकर भगवान महावीर यांचा जन्मकल्याणक महोत्सव मंगळवारी पाचोडला मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. पाचोड, ता.पैठण येथे अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने काढलेल्या मिरवणुकीतून जैनबांधवांनी सामाजिक एकोपा, अहिंसा, पर्यावरण संवर्धन, पाणी वाचवा, बेटी बचाव, शाकाहार याबाबत जनजागृती केली. 

महावीर जन्मकल्याणक महोत्सव असल्यामुळे सकाळीच पाचोड मधील सकल जैन समाज श्री १००८ चंद्रप्रभु दिगंबर जैन मंदिरात एकत्रित जमा झाले होते यावेळी भगवान महावीर यांच्या प्रतिमेचा महामस्तकाभिषेक सोहळा करण्यात आला आहे यानंतर पाचोड गावातून भव्यदिव्य मिरवणूक काढण्यात आली होती यावेळी डॉ राजकुमार पाटणी , डॉ संजयकुमार पाटणी , अभिषेक पाटणी , सोहम पाटणी यांच्या वतीने महाप्रसादाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

         यावेळी पालकमंत्री संदीपान भुमरे पाटील , पैठण तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती राजू भुमरे पाटील , सरपंच शिवराज भुमरे , उपसरपंच शिवाजी भालसिंगे , माजी सरपंच जयकुमार बाकलीवाल , व्यापारी संजय सेठी , व्यापारी सुरेश बडजाते , सोसायटीचे चेअरमन जिजा भुमरे , व्यापारी महासंघाचे अध्यक्ष सुनील मेहेत्रे , राहुल नारळे , ग्रामपंचायत सदस्य अनिल भुमरे , अशोक बडजाते , डॉ राजकुमार पाटणी , महेंद्र पांडे , डॉ वर्धमान बाकलीवाल , डॉ संजयकुमार पाटणी , आशिष पांडे , बाबूलाल पांडे , दीपक खोबरे , राजेश सेठी , चेतन पांडे , केतन बडजाते , महेंद्र जैन , राजेश बडजाते , नितीन बडजाते , ललित जैन राजू काला , अशोक सोनटक्के ,पारस बाकलीवाल , महावीर मेहेत्रे , पारस मेहेत्रे बाहुबली मेहेत्रे , सचिन मेहेत्रे , पंकज काळे , सुयोग बाकलीवाल , अक्षय बाकलीवाल , दीपक कासलीवाल , पारस अजमेरा , अशोक बागमार , सतीश बागमार , बंग आदी हजर होते