जळगाव जामोद
स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने रोगदान शिबिराचा 231 जणांनी घेतला लाभ तालुक्यातील वडशिंगी येथे शेतकरी संघटनेचे विदर्भ अध्यक्ष प्रशांत डिक्कर यांच्या संकल्पनेतून अकोला येथील प्रसिद्ध विशेषतज्ञ डॉक्टर प्रतीक लड्ढा यांच्या मार्गदर्शनाखाली मूत्रपिंड मूत्र व मुतखडा आजारासंबंधी 231 रुग्णांची तपासणी करत भव्य दिव्य मोफत रोगदान व मार्गदर्शन शिबिर पार पडले शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी प्रशांत डिक्कर व डॉक्टर प्रतीक लड्डा ग्रामपंचायत सदस्य सुमन ताई सातव गणेश डामरे नितीन भगत वकील खा यांच्या हस्ते महात्मा ज्योतिबा फुले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून शिबिराची सुरुवात करण्यात आली होती यावेळी पंचक्रोशीतील आलेल्या महिला पुरुष लहान मुले असे 231 जणांची तपासणी करण्यात आली यामध्ये 33 रुग्णांचे मोफत किडनी स्टोनचे अकोला येथे ऑपरेशन करण्यात येणार असल्याचे विशेषतज्ञ डॉक्टर प्रतीक लढा यांनी यावेळी सांगितले प्रशांत डिक्कर यांच्या माध्यमातून जागोजागी शिबिराचे आयोजन करून उपस्थित डॉक्टरांनी प्रशांत डिक्कर यांचे कौतुक केले शिबिराचा समारोप यशस्वी करण्यासाठी विजय मानकर विलास इंगळे सुनील जाधव प्रदीप खीरोडकार सागर मोरखडे गोपाल वायझोडे यांनी परिश्रम घेतले यावेळी विजय सातव श्रीराम कापसे तेजराव वाघ बहुसंख्य मान्यवर उपस्थित होते