. मानवहित लोकशाही पक्षाच्या शाखेच गेवराई तालुक्यात शाखा स्थापनेला झाली सुरुवात
गेवराई ( सखाराम पोहिकर) गेवराई तालुक्यातील पाथरवाला . बांगपिपळगाव व ढोमलगाव ता अंबड जिल्हा जालना येथे शहागड व इतर गावात मानवहित लोकशाही पक्षाच्या शाखा स्थापन करण्यात आल्या यावेळी उद्वाघाटक म्हणून पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष व मातग समाजाचे आधारस्तंभ आदरणीय सचिन भाऊ साठे हे उपस्थित होते यावेळी मा सचिन भाऊ साठे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाले की समाजाला राजकीय सत्तेत जो पर्यंत वाटा मिळत नाही तो पर्यत आपल्या समाजाचा विकास होणार नाही व समाजावरील अन्याय हि कमी होणार नाही म्हणून मातंग समाजाने मोठ्या ताकतीने राजकारणात आले पाहिजे अशा उपदेश दिला यावेळी प्रमुख उपस्थिती म्हणून बीड जिल्हा अध्यक्ष हानुमान ( नाना ) क्षीरसागर व जालना जिल्हा अध्यक्ष रवी भाऊ कसाब अबड तालुका . अध्यक्ष भगवान अडागळे गेवराई तालुका अध्यक्ष बाबासाहेब कांबळे तालुका उपाध्यक्ष हिरामण खंदारे बीडचे उपजिल्हा अध्यक्ष प्रकाश ( दादा ) धुतडमल तसेच गावातील प्रतिष्ठित नागरीक व पक्षाचे अबंड तालुक्यातुन र्व गेवराई व माजलगाव तालुका अध्यक्ष खंडागळे व इतर पदाधिकारी उपस्थित होते यावेळी घनसागवी युवक अध्यक्ष म्हणून नारायण लोढे यांची निवड करण्यात आली