अवैध वाळूची वाहतूक करणारे ट्रॅक्टर पकडले
ओम धगाल - पूर्व प्रदेश कार्यकारिणी सदस्य भाजपा युवा मोर्चा
ओम धगाल की और से हिंडोली विधानसभा क्षेत्र एवं बूंदी जिले वासियों को रौशनी के त्यौहार दीपावली की हार्दिक बधाई व शुभकामनाएं
पाचोड/स्वतःच्या फायद्यासाठी नदीपात्रातून अवैैधरित्या वाळू वाहतूक करणार एक ट्रॅक्टर पाचोड पोलिसांनी सोमवारी (दि.३)रोजी मध्यरात्री पकडले असुन ट्रॅक्टर व एक ब्रास वाळू पोलिसांनी जप्त केली असून, याप्रकरणी पाचोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याविषयी अधिक माहीती अशी की, पैठण तालुक्यातील हिंगणी शिवारात नदी पात्रातून ट्रँक्टरव्दारे वाळूचा उपसा करून विना परवा वाहतूक केली जात असल्याचे पाचोड पोलिस ठांण्याचे उपनिरीक्षक सुधाकर मोहीते यांना भेटली असता ते तात्काळ हिंगणी परिसरात गेल्यावर तिथे त्यांना सोनालिका कंपनीचे ट्रँकर वाळूने भरलेले जाताना दिसून आले. त्यांनी लागलीच ट्रॅक्टर थांबले. मात्र चालक अंधाराचा फायादा घेऊन पसार झाला आहे.यांऩतर ट्रॅक्टर व एक ब्रास वाळू सह ७ लाख ५५ हजार रुपये चा मुद्देमाल जप्त करण्यात आली. याप्रकरणी पाचोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ट्रँक्टरवर गुन्हा दाखल करण्यात आला असून सहाय्यक पोलिस निरिक्षक संतोष माने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक प्रशांत नांदवे हे करीत आहेत.