पॅरोलवरील फरार दरोडेखोरास अटक

पाचोड (विजय चिडे)राज्यात गाजलेल्या कोठेवाडी प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेला कुख्यात दरोडेखोर पॅरोलवर असताना फरार झाला होता. गेल्या वर्षभरापासून पोलिस त्याचा शोध घेत होते. अखेर पाचोड पोलिसांनी रविवारी (दि. २) सायंकाळी विहामांडवा ते खंडाळा शिवारातून त्याच्या मुसक्या आवळल्या. दारासिंग वकिल्या भोसले (वय ५०) असे सदर दरोडेखोराचे नाव आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, अहमदनगर जिल्ह्यातील कोठेवाडी (ता. पाथर्डी) दरोडा प्रकरणामुळे राज्य हादरून गेले होते. या गुन्ह्यातील कुख्यात दरोडेखोर दारासिंग भोसले हा हसूल जेलमध्ये जन्मठेपेची शिक्षा होते. भोगत होता; पण मागील वर्षी सात दिवसांच्या पॅरोलवर तो गावाकडे आला होता; मात्र सुटी संपल्यानंतर तो जेलमध्ये न जाता फरार झाला. त्यामुळे वर्षभरापासून पोलिस त्याचा शोध घेतरविवारी सकाळी नऊ वाजेच्या सुमारास पाचोड पोलिसांना खबऱ्याने दारासिंग हा विहामांडवा, खंडाळा शिवारात फिरत असल्याची माहिती दिली. त्यानुसार सपोनि संतोष माने, पोउनि सुशांत सुतळे, पोलिस जमादार ताराचंद घडे, पोलिस हवालदार नागनाथ केंद्रे, संदीप पाटेकर, योगेश केदार व अफसर बागवान आदींच्या पथकाने खंडाळा शिवारात शोध सुरू केला. तब्बल सहा तासानंतर दारासिंग हा एका उसाच्या शेतात आढळला.

पोलिसांनी चोहोबाजूंनी घेरून त्याला अटक केली. सायंकाळी साडेपाच वाजता त्याला पाचोड पोलिस ठाण्यात आणण्यात आले. पोलिसांच्या या कारवाईचे पोलिस अधीक्षक मनीष कलवानिया, अतिरिक्त पोलिस अधीक्षक सुनील लांजेवार, पैठण विभागाचे उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. विशाल नेहुल यांनी पाचोड पोलिसांचे कौतुक केले.