केसनंद मध्ये अखंड हरिनाम सप्ताह आयोजन

केसनंद /वार्ताहर

केसनंद (ता.हवेली) येथील देवपंच देवस्थान ट्रस्ट व ग्रामस्थांच्या वतीने अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. सप्ताहाचे हे २८ वे वर्ष आहे. शुक्रवार (दि. २४ ते शुक्रवार दि. ३१) पर्यंत हा सप्ताह आयोजित करण्यात आला आहे. केसनंद गावामध्ये हा सप्ताह आयोजित केला आहे. यामध्ये ज्ञानेश्वरी पारायण, हरीजागर, प्रवचन ,विविध कीर्तनकार महाराजांचे किर्तन, महाप्रसाद असे कार्यक्रम होणार आहेत. बालाजी महाराज कुलथे यांच्या कीर्तनाने सप्ताहाला सुरुवात झाली व डॉ.जलाल महाराज सय्यद यांच्या काल्याच्या कीर्तनाने सप्ताहाची सांगता होईल.तर सप्ताह दरम्यान बालकीर्तनकार स्वप्नाली पाटीलचे ही कीर्तन होणार आहे. 

    केसनंद गाव व परिसरातील नागरिकांनी कीर्तन सोहळ्यास उपस्थित रहावे असे आवाहन केसनंद ग्रामस्थ व देवपंच देवस्थान ट्रस्ट यांच्यावतीने करण्यात आले आहे.