शिरुर - देवदर्शनाहुन परतत असताना पुणे नगर महामार्गावर  कामरगाव जवळ झालेल्या अपघातात आमदाबाद ता. शिरुर येथील ६ युवकाना प्राण गमवावे लागले. मृत्युमुखी पडलेल्या युवकांच्या कुटुंबियाच्या सदस्यांची भेट घेवुन त्यांचे सांत्वन माजी गृहमंत्री दिलिपराव वळसे पाटील यांनी केले .

गुढी पाडवाच्या दिवशी आमदाबाद येथील भाविक देवदर्शनासाठी शनि शिंगणापूर व देवगड येथे गेले होते. देवदर्शन करुन घरी परतत असताना त्यांच्या वाहनाला अपघात झाला. त्यात राजेंद्र साळवे , मयुर साळवे , विजय अवचिते ,समाधान साळवे ,धीरज मोहिते व ओंकार गोरखे हे मरण पावले .हे सर्व ऐकमेकांचे  जवळचे नातेवाईक आहेत .

माजी गृहमंत्री वळसे पाटील यानी आमदाबाद येथे येवुन साळवे व अवचिते कुटुंबियांची भेट घेवुन सांत्वन केले यावेळी वळसे पाटील यांच्या समवेत देवदत्त निकम , प्रदीप वळसे पाटील, मानसिंग पाचुंदकर , प्रभाकर गावडे , दामूअण्णा घोडे , विश्वास कोहोकडे , सरपंच लिलाबाई पवार ,माजी सरपंच योगेश थोरात , प्रकाश थोरात , नितीन थोरात आदी होते .

फोटो ओळी 

माजी गृहमंत्री दिलिपराव वळसे पाटील यानी आमदाबाद येथे साळवे ,अवचिते , मोहिते व गोरखे कुटुंबियाची भेट घेवून सांत्वन केले