पचोडच्या शिवछत्रपती महाविद्यालयात माजी विद्यार्थी मेळावा उत्साहात..
पाचोड (विजय चिडे) महाविद्यालय आठवणींना उजाळा देत पाचोडच्या शिवछत्रपती महाविद्यालयाचा माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा उत्साहात पार पडला आहे.
शिवछत्रपती महाविद्यालयाची स्थापना जून १९९९ साली झाली तेव्हापासून ते आजपर्यंत म्हणजे २३ वर्षातील महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी या मेळाव्यात सहभागी झाले होते.या निमित्ताने परत एकदा एकत्र आलेले सर्व माजी विद्यार्थी आठवणीत हरवून गेले होते महाविद्यालयातील माजी विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष दादा एखंडे, सदस्य सतीश नलावडे व कृष्णा चावरे हे व्यासपीठावर होते कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. चंद्रसेन कोठावळे, प्रमुख पाहुणे डॉ.बाबासाहेब गोन्टे व उपप्राचार्य डॉ शिवाजी यादव यांची प्रमुख उपस्थिती होती.
या मेळाव्यास महाविद्यालयात कार्यरत असलेला कमवा व शिका योजना याकडून विद्यार्थ्यांना मानधन मानधनाचे वाटप व स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राचे उद्घाटन सर्व मान्यवरांच्या हस्ते झाले. या मेळाव्यात दादा एखंडे, सतीश नलावडे ,किरण काळे व राजेंद्र शिंदे आदींनी आपले मनोगत व्यक्त केले. त्याचबरोबर माजी विद्यार्थ्यांमध्ये प्रामुख्याने सुरेश शेळके, पप्पू शेळके, राजेंद्र शिंदे, सचिन थोटे, संजय मापारी, गजानन गवारे, अशोक गायकवाड, सतीश वाघ, शिवाजी शेळके व पोलीस अधिकारी चंद्रकला राठोड आदी उपस्थित होते. अध्यक्षीय समारोप प्राचार्य डॉ. चंद्रसेन कोठावळे यांनी केला. प्रास्ताविक डॉ. शिवाजी यादव यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. विनोद कांबळे यांनी केले तर आभार डॉ.उत्तम जाधव यांनी मानले या कार्यक्रमास सर्व माजी विद्यार्थी महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. शेवटी स्नेह भोजनाचा आस्वाद घेऊन विद्यार्थ्यांनी महाविद्यालयाचा निरोप घेतला.