पाचोड खुर्द येथे एकाची औषध प्राशन करून आत्महत्या..

पाचोड/प्रतिनिधी, मोलमजुरी करणाऱ्या एका ३५ वर्षीय विवाहित तरुणाने विषारी औषध प्रशासन करून आत्महत्या केल्याची घटना पाचोड खुर्द ता.पैठण येथे रविवारी दि.१२ राञी ८ वाजेच्या सुमारास घडली असून शिवाजी बाबासाहेब उचित रा.पाचोड खुर्द ता.पैठण असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव असून त्यांच्या आत्महत्याचे नेमके कारण माञ समजू शकले नाही. 

याबाबत अधिक माहिती अशी की, शिवाजी उचित हे गेल्या अनेक वर्षापासून पाचोड येथील बस स्थानकामध्ये काम करायचा रविवारी दिवसभर त्याने काम केली. नंतर स्वतःच्या घरात आठ वाजेच्या दरम्यान विषारी औषध घेतले ही बाब घरच्यांना कळताच त्यास तात्काळ पाचोड येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी शिवाजी उचित याच्यावर प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी छत्रपती संभाजी नगर येथील शासकीय घाटी रुग्णालयात पाठविले असता तेथे शिवाजी याच्यावर प्राथमिक उपचार सुरू असता सोमवारी पहाटे पावणेचार च्या सुमारास उपचारा दरम्यान शिवाजी यांची प्राणज्योत माळवली वैद्यकीय अधिकाऱ्याने त्यास तपासून मृत घोषित केले. या घटनेचे नोंद पाचोड पोलीस ठाण्यामध्ये करण्यात आलेली असून पुढील तपास प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रल्हाद मुंढे यांच्या मार्गदर्शनाखाली बीट जमादार अण्णासाहेब गव्हाणे, पोलीस नाईक पवन चव्हाण हे करीत आहेत.