*विहिरीत पडलेल्या बकरीच्या पिल्लाचा जिव वाचविण्यासाठी गेलेल्या तरुणाचा विहीरीत बुडून मृत्यु*
पैठण तालुक्यातील होनोबाची वाडी येथील घटना "
पाचोड विजय चिडे/ विहिरीत पडलेल्या बकरीच्या पिल्लाचा जिव वाचविण्यासाठी गेलेल्या एका ३४ वर्षीय तरुण शेतकऱ्याचा विहिरीत पडुन मृत्यू झाल्याची घटना आज शुक्रवारी दुपारी तीन वाजेच्या सुमारास पैठण तालुक्यातील होनोबाची वाडी शिवारात घडली.
भगतसिंग आसाराम महेर ( वय ३४ ) रा, होनोबाची वाडी असे मृत झालेल्या तरुणाचे नाव आहे.आसाराम महेर यांची गट नं ७३ मध्ये शेती असून त्यांनी व त्यांचा मुलगा भगतसिंग महेर यांनी आज शुक्रवारी सकाळी दिनचर्याप्रमाणे आपल्या स्वतः च्या शेतात त्यांच्या मालकीच्या असलेल्या बकऱ्या चरण्यासाठी सोडल्या होत्या.दुपारच्या सुमारास बकऱ्या चरत असताना अचानक एका बकरीचे पिल्लू विहारीत पडल्याचे भगतसिंग महेर याला कळताच तो दोरीच्या साहाय्याने विहिरीत उतारला मात्र त्याच्या हातातुन दोरी सटकल्याने भगतसिंग हा विहिरीत खाली पाण्यामध्ये पडला तेंव्हा भगतसिंग यांचे वडील विहिरीच्या काठावर वरती असल्याने त्यांनी हे दृष्य पाहुन जोरजोरात आरडा ओरड करण्यास सुरुवात केली परंतु भगतसिंग याला पोहता येत नसल्याने त्याचा पाण्यात बुड़ुन मृत्यु झाला. घटनेची माहिती गावात कळताच ग्रामस्थांनी विहिरीकडे धाव घेतली तसेच विहिरीत पाणी जास्त असल्याने भगतसिंगला शोधण्यासाठी मोठी कसरत करावी लागली अखेर गळाच्या सहाय्याने भगतसिंग याला ग्रामस्थांनी विहिरीतुन बाहेर काढले.भगतसिंग याच्या पश्चात पत्नी,एक मुलगा,एक मुलगी,आई - वडील,एक भाऊ असा परिवार आहे.याची नोंद पाचोड पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.