पंचायत समिती हिंगोली येथे तिरंगा ध्वज केंद्राचे उद्घाटन
आज दिनांक 6 ऑगस्ट रोजी दुपारी 1 वाजता जिल्हा परिषदेचे आजादी का अमृत महोत्सव त्याच्या निमित्ताने घर घर तिरंगा केंद्राचे उद्घाटन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय दैने यांच्या हस्ते करण्यात आले.उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. विशाल राठोड, गटविकास अधिकारी बोथीकर, भोजे, आमले, यांच्यासह हिंगोली तालुक्यातील ग्रामसेवकांची इतर अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. आजादी का अमृत महोत्सव च्या निमित्ताने 13 ऑगस्ट 15 ऑगस्ट तिरंगा ध्वज आपल्या घरावर लावावा. 15 ऑगस्ट रोजी संध्याकाळी तिरंगा ध्वज सन्मानपूर्वक उतरावा असे आवाहनही यावेळी करण्यात आली आहे.