काँग्रेसच्या प्रभारी जिल्हाध्यक्षपदी दिलीपराव देसाई यांची निवड
हिंगोली काँग्रेस कमिटीच्या प्रभारी जिल्हाध्यक्षपदी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या आदेशावरून प्रदेश संघटन सरचिटणीस देवानंद पवार यांनी दिलीपराव देसाई यांची निवड केल्याचे जाहीर केले. या निवडीमुळे पक्षांतर्गत उत्साह निर्माण झाला असून येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जिंकण्याचे मनोधैर्य कार्यकर्त्यांमध्ये निर्माण झाले आहे.
दिवंगत खासदार राजीव भाऊ सातव यांचे कट्टर समर्थक व सर्वांना सोबत घेऊन चालण्याची क्षमता असणाऱ्या दिलीपराव देसाई यांची प्रदेश स्तरावरून आज प्रभारी जिल्हाध्यक्ष पदी निवड करण्यात आली.या निवडीचे वृत्त कळताच जिल्ह्यातील काँग्रेसच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी आनंद व्यक्त केला असून येणाऱ्या निवडणुका काँग्रेस पक्ष ताकदीने लढवून जिंकणार असल्याचा मनोदय व्यक्त केला आहे.या निवडीबद्दल काँग्रेस पक्षाचे आजी-माजी लोकप्रतिनिधी पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी अभिनंदन केले आहे.
सर्वांना सोबत घेऊन संघटन मजबूत करणार- दिलीपराव देसाई पक्षाने माझ्यावर टाकलेली जबाबदारी ही अत्यंत महत्त्वाची असून येणाऱ्या काळात जिल्ह्यात पक्ष संघटन मजबूत करण्यासह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये आ.प्रज्ञाताई सातव यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील काँग्रेस पक्षाच्या सर्व आजी माजी लोकप्रतिनिधिंना सोबत घेऊन पक्षाचा झेंडा फडकविण्याचा निर्धार केला असल्याची प्रतिक्रिया दिलीपराव देसाई यांनी व्यक्त केली.