पुण्यातील कसब्याच्या निकालातून भ्रमाचा भोपळा फुटला,
पारंपरिक गड उध्वस्त; सत्ता कोणाचीही असो जनता कुणासोबत हे महत्त्वाचं
पुणे : कसबा विधानसभा मतदार संघात महाविकास आघाडीचे उमेदवार रविंद्र धंगेकर यांनी भाजपचे उमेदवार हेमंत रासने यांना धोबीपछाड देत तब्बल अकरा हजाराहून अधिक मताधिक्याने विजय मिळविला.
संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेल्या कसबा पोटनिवडणुकीत सुरुवातीपासूनच मतदाराबरोबरच सर्व पक्षांच्या पदाधिकाऱ्यांकडून सर घेतला होता.महाविकास आघाडीकडून जोरदार ताकद लावण्यात आली प्रत्येक घटक पक्ष ताकद पणाला लावून निवडणूकीत उतरला होता.मतदारांनीही यात आपली ताकद दाखवून देत भाजपाचा पारंपरिक मतदार संघ उध्वस्त केला.मतदारांना कोणीच गृहीत धरुन नये असाच संदेश यातून पुढे आला.
मुळात रविंद्र धंगेकर यांचे तळागाळातील कार्य याचाच परिणाम या निवडणूकीत दिसून आला.सर्वसामान्य नागरिकांना आपला माणूस म्हणून प्रतिनिधी हवा असतो आणि हेच कसब्यातील निवडणूकीत पहावयास मिळाले.त्यामुळे यातून ब्रॅड धंगेकर हा प्रवाह उभरुन आला हेही तेवढेच महत्त्वपूर्ण आहे.
केवळ पारंपरिक मतदार आणि राजकारण हे सध्यातरी चालत नाही याची प्रचिती चाणाक्ष पुणेकरांनी दाखवून दिली.आम्हाला पोकळ आश्वासन नको, ठोस पावले उचलणे आवश्यक आहे हे यातून अधोरेखित झाल आहे.
या निकालानंतर सर्वसामान्यांच्या आलेल्या प्रतिक्रियेवर सत्ताधाऱ्यांनी वेळीच आत्मचिंतन करण्याची वेळ आहे.