सर्वच निवडणूका ताकतीने लढवणार – मंगलदास बांदल

( शिक्रापूर प्रतिनिधी ) पुणे जिल्हा परिषदेच्या आरोग्य व बांधकाम विभागाचे माजी सभापती तसेच राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष मंगलदास बांदल नुकतेच कारागृहातून बाहेर आलेले असताना त्यांनी आज नुकतीच पत्रकार परिषदे घेत भूमिका जाहीर केली असून यापुढील प्रत्येक निवडणुका मोठ्या ताकतीने लढवणार असल्याचे मंगलदास बांदल यांनी जाहीर केले आहे.

                               पुणे जिल्हा परिषदेच्या आरोग्य व बांधकाम विभागाचे माजी सभापती तसेच राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष मंगलदास बांदल बँकेच्या गैरव्यवहार प्रकरणी काही महिने कारागृहात होते, ते नुकतेच कारागृहाबाहेर आलेले असताना त्यांनी लगेचच मैदानात उतरण्यास सुरुवात केली असताना आपण पत्रकार परिषद घेऊन पुढील भूमिका जाहीर करणार असल्याचे त्यांनी सांगितले होते, नुकतीच बांदल यांची पत्रकार परिषद पार पडली यावेळी युवा नेते निखील बांदल, ॲड. आदित्य सासवडे, पोलीस पाटील किरण काळे, बाबू पाटील ढमढेरे, निलेश मयूर ओस्तवाल, निलेश खरबस, गणेश वाळके, अनिकेत गायकवाड, दिपक मगर यांसह आदी कार्यकर्ते उपस्थित होते, दरम्यान यावेळी बोलताना माझ्यावर कारवाई करण्यासाठी एका पोलीस निरीक्षकाला आणण्यात आले होते त्यांनतर सदर कारवाई घडवून आणून मला कारागृहात जावे लागले मात्र कारागृहात गेल्याने मला कारागृहाचा इतिहास माहित झाला, सदर ठिकाणी व्यायाम करत राहिल्याने माझी शुगर नाहीसी झाली तसेच अनेक लोकांशी जवळचा संबंध आला त्यामुळे हे घडवणाऱ्याला मी शुभेच्छा देतो असे त्यांनी सांगत लोकप्रतिनिधींनी पात्रता पाळणे काळाची गरज असल्याचे सांगितले, तर येणारी प्रत्येक निवडणूक मोठ्या ताकतीने लढवणार असल्याचे सांगितले, मात्र यावेळी पत्रकारांनी पक्ष कोणता याबाबत विचारणा केली असता सध्या राज्यात चिन्हासाठी पळापळ सुरु त्यात आपले काय चालणार असे बोलत, मी स्वतः कोणत्या पक्षात गेलो नव्हतो यापूर्वी अपक्ष जिल्हा परिषद लढवल्यानंतर दुसऱ्यांदा अजित पवार यांनी स्वतः बोलावून घेत पक्षाकडून जिल्हा परिषदेची उमेदवारी दिली होती, तर भाजपाकडे विधान सभेसाठी उमेदवार नसल्याने त्यांच्या नेत्यांनी स्वतः मला बोलावून विधानसभेची उमेदवारी दिली होती, तसेच राष्ट्रवादीच्या नेत्यांनी देखील लोकसभेवेळी मला काही शब्द देत स्वतः राज्याचे उपाध्यक्ष पद दिलेले होते, त्यामुळे आपण कोणत्याही पक्षात स्वतः गेलो नसल्याचे सांगत सध्या मी चिखलात असून चिखलात कमळ येथे, चिखलातून सावरायला हात द्यावा लागतो, टाईम पाहायला घड्याळ लागते तसेच तीर मारायला बाण देखील लागतो असे बांदल यांनी सांगितले.