सहा महिन्यापूर्वी बेपत्ता असणाऱ्या व्यक्तीचा मृतदेह सापडला.

"पैठण तालुक्यातिल मुरमा शिवारातिल घटना"

पाचोड/  पाचोड येथील कल्याणनगर मधील एक ५५ वर्षी व्यक्ती घरातून सहा महीन्यापूर्वी बेपत्ता झाल्याची घटना घडली होती.मात्र (दि,१८)रोजी सायंकाळी सातच्या दरम्यान त्या बेपत्ता व्यक्तीचा मृतदेह मुरमा ता.पैठण शिवारात आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.

याविषयी पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार,पाचोडच्या कल्याणनगर भागातील बबन बेगाजी भोजणे (वय५५)हे (दि.५)सप्टेंबर २०२२ रोजी घरात कोणालाही काही न सांगत घराबाहेर पडले होते.त्यानंतर चार दिवस उलटूनही ते घरी आले नसल्यामुळे त्याच्या बंधूने (दि.८)सप्टेंबर रोजी बबन भोजणे हे बेपत्ता असल्याची तक्रार पाचोड पोलिस ठाण्यात दाखल केली होती.परंतु गेल्या सहा महीन्यापासून भोजणे यांचा पत्ता लागत नव्हता पण (दि.१८)रोजी मुरमा शिवारात एक मृतदेह आढळून आला असता स्थानिक नागरिकांना शंका आली कि, हा मृतदेह भोजणे यांचा असू शकतो,यावेळी भोजणेच्या नातेवाईकांला या बोलून घेतले असता त्यांच्या मुलाने हा मृतदेह बबन भोजणे यांचा असल्याची ओळख पटविले आहे.बबन भोजणे यांचा ज्याठिकाणी मृतदेह सापडला त्याठिकाणी एका लिबांच्या झाडाला दोरी लटकल्याची निदर्शनास येत असल्यामुळे भोजणे यांनी नेमके आत्महत्या केली की,यात काही घातपात असल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.या घटनेची माहीती पाचोड पोलिसांना देण्यात आली असता सहाय्यक पोलिस निरिक्षक संतोष माने,उपनिरिक्षक सुरेश माळी,बिटजमादार अन्नासाहेब गव्हाणे,पोलिस नाईक पवन चव्हाण,संदीप पाटेकर यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन या घटनेचा पंचनामा केला आहे. बबन भोजणे यांचा मृतदेह उतरीय तपासणी साठी पाचोड येथील ग्रामीण रूग्णालयात दाखल केला असता. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी भोजणे यांची उतरीय तपासणी केली आहे.या घटनेची नोंद पाचोड पोलिस ठाण्यांत करण्यात आली असुन पुढील तपास पाचोड पोलिस करीत आहेत.