*शिवसेना उपनेते अर्जुनराव खोतकर यांनी मुख्यमंत्र्यांना दिले जालना भेटीचे निमंत्रण.
जालना जिल्ह्यातील प्रलंबित विकास कामांना गती मिळण्यासाठी निधी मंजूर करावा, रामनगर येथील साखर कारखाना सुरू करण्यासाठी राज्यशासनाने मदत करावी व विविध विषयांवर अर्जुन खोतकर यांनी मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांच्या सोबत मंत्रालय मुंबई येथे आज दि. ०५ ऑगस्ट शुक्रवार रोजी चर्चा करून जालना जिल्ह्याचे भेटीसाठी निमंत्रण दिले. यावेळी आ. अब्दुल सत्तार, शंभुराजे देसाई, भरत गोगावले, प्रकाश अबिटकर माजीमंत्री सुरेश नवले, पंडीत भुतेकर उपस्थिती होते.