परतुर प्रतिनिधि
मौजे डोल्हारा येथे वाळू माफियांचा उपविभागीय अधिकान्यासह पथकावर झालेल्या हल्ल्याचा निषेध म्हणुन एक दिवस लेखन बंद अंदोलन करण्याचे निवेदन तलाठी, मंडळ अधिकारी तसेच तहसील कार्यालयातील लिपिक, अव्वल कारकून व इतर सर्व महसुल कर्मचार्याच्या वतीने तहसीलदार यांणा निवेदन देण्यात आले असुण निवेदना मध्ये , दिनांक 05/02/2023 रोजी मा. उपविभागीय अधिकारी हे आपले महसुल चे पथक घेऊन दुपारी अवैध वाळू वाहतूकीवर कारवाई करणेसाठी डोल्हारा शिवारात गस्त घालत असताना वाळू माफियाचे वाळूने भरलेले ट्रक्टर पकडले असता पथकाला शिवीगाळ करून धक्काबुक्की करून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची दुर्दैवी घटना घडली. या घटनेचा तलाठी संघ परतूर व महसूल कर्मचारी संघटना तहसील कार्यालय परतूर जाहीर निषेध करत असल्याचे तहसीलदार यांणा दिलेल्या निवेदना मध्ये नमुद करण्यात आले तसेच तालुक्यामध्ये अवैधं गौणखनिज वाहतूक कामी बहुतांश वाहने विना क्रमांकाचे वापरली जात असुण त्यावर RTO विभागाने पथक स्थापन करून कारवाई करावे तसेच परतूर तालुक्यात वारंवार अश्या घटना घडत असून अवैध गौणखनिज पथकातील सर्व सदस्यांच्या मनात भितीचे वातावरण निर्माण झाले असून त्याचे मानसिक खच्चीकरण होत आहे या अवैध रेती उपस्याला आळा घालण्यासाठी तालुक्यातील पोलीस प्रशासनजो पर्यंत प्रामाणिकपणे सहकार्य करत नाही तो पर्यंत अशा घटनांना लगाम लागणार नाही. कारवाई करत असताना ट्रक्टर पकडले जरी तरी त्या ट्रक्टरवरील चालक पळून जात असल्याने सदरील ट्रक्टर पोलीस स्टेशन पर्यंत आनण्यात मोठी अडचन निर्माण होते पकडलेले वाहन पोलीस स्टेशन कसे मोठा प्रश्नन उपस्थित होतो
या पुढे पथकासोबत वरिष्ठ दर्जाचे एक अधिकारी आणी दोन शस्त्रधारी पोलीस व एक प्रशिक्षित वाहन चालक सोबत देण्यात यावा अशी मागणी निवेदना व्दारे तहसीलदार यांच्या कडे करण्यात आली असुण निवेदनावर सर्व तलाठी महसुल कर्मचारी यांच्या सहया आहेत