मुंबई : भरडधान्य हे अन्नाचा एक महत्वाचा स्त्रोत असून खाद्यपदार्थ म्हणून त्याची निवड करणे काळाची गरज आहे. भरडधान्यांच्या उत्पादनाला प्रोत्साहन देण्यासाठी ही आंतरराष्ट्रीय परिषद एक महत्त्वाचे पाऊल आहे. त्यासाठी भरडधान्य उत्पादनाला प्रोत्साहन देऊन त्याचे ब्रँडिंग करणे गरजेचे आहे. असे प्रतिपादन उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी केले.आज मुंबईत रामनारायण रुईया महाविद्यालयामध्ये दोन दिवसांची आतंरराष्ट्रीय भरडधान्य परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. त्यावेळी मंत्री श्री. पाटील बोलत होते.या उद्घाटन प्रसंगी रामनारायण रुईया महाविद्यालयाचे प्राचार्या डॉ.अनुश्री लोकूर, पद्मश्री खादर वल्ली, व्यवस्थापकीय परिषदेचे अध्यक्ष एस.पी. मंडळी, अॅड. एस. के. जैन, श्रीकृष्ण चितळे, महाविद्यालय विकास समिती अध्यक्ष अड.मिहीर प्रभुदेसाई, प्रा. कामिनी दोंदे,उपप्राचार्य डॉ.वर्षा शुक्ला,विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.पाटील म्हणाले की, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या पुढाकाराने संयुक्त राष्ट्रांच्या सर्वसाधारण सभेत, सन 2023 हे वर्ष आंतरराष्ट्रीय भरडधान्य वर्ष म्हणून जाहीर करण्यात आले आहे. या प्रस्तावाला जगभरातील अनेक देशांनी पाठिंबा दिला आहे. यामुळे भरडधान्याच्या योगदानाचे महत्व, आणि पोषक आरोग्यदायी आहार म्हणून त्याची उपयुक्तता याबद्दल जनजागृती करण्यात येत आहे. याचाच भाग म्हणून रुईया महाविद्यालयात दोन दिवसाची आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. या परिषदेमुळे आरोग्यदायी आहारामध्ये भरडधान्यचे महत्व आणि उपयुक्तता याबाबत महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना माहिती आणि या क्षेत्रात संशोधन करण्यास प्रोत्साहन मिळेल, असेही उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी सांगितले.
Join our app to earn points & get the text & video content in your preffered language
PLease Click Here to Join Now
Search
Categories
- City News
- State News
- National
- Crime
- Entertainment
- Viral News
- Special
- Sports
- Politics
- Business
- International
- Health
- Spiritual
- Agriculture
- Education
- Election
Read More
અમીરગઢ ઈકબાલગઢ ગામે રબારી સમાજની જાહેર સભા યોજાઈ@live24newsgujarat
અમીરગઢ ઈકબાલગઢ ગામે રબારી સમાજની જાહેર સભા યોજાઈ@live24newsgujarat
Fiscal Management Has Completely Collapsed in Punjab: Chugh
CM Should Quit for Increasing Indebtedness and Financial Mess: Chugh
Bhartiya Janta Party’s...
પાલીતાણા કાલ ભૈરવમંદિરના 132 વર્ષ પૂર્ણ થયા,કાર્યક્રમો કરવામાં આવ્યા
પાલીતાણા કાલ ભૈરવમંદિરના 132 વર્ષ પૂર્ણ થયા,કાર્યક્રમો કરવામાં આવ્યા
Randeep Hooda Lin Laishram Marriage : रणदीप हुड्डा और लिन लैशराम की मणिपुर में शादी (BBC Hindi)
Randeep Hooda Lin Laishram Marriage : रणदीप हुड्डा और लिन लैशराम की मणिपुर में शादी (BBC Hindi)
কাকপথাৰত উত্তাল প্ৰতিবাদ
জনজাতিকৰণৰ ক্ষেত্ৰত কেন্দ্ৰীয় চৰকাৰে প্ৰতাৰণা কৰাৰ অভিযোগত কাকপথাৰত মৰাণ ছাত্ৰ সন্থা, মৰাণ মহিলা...