रामनाथ विद्यालयाचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न 

औसा :- श्री रामनाथ माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय आलमला. तालुका औसा या विद्यालयाचे वार्षिक स्नेहसंमेलन दिनांक 28 जानेवारी 2023 रोजी सायंकाळी विद्यालयाच्या प्रांगणामध्ये मोठ्या उत्साहात साजरे करण्यात आले. या कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून औसा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री शंकरराव पटवारी हे उपस्थित होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रामनाथ शिक्षण संस्थेचे अध्यक्ष ऍड.उमेश पाटील तर प्रमुख अतिथी म्हणून श्री. विश्वनाथ बिराजदार, चेअरमन विकास सोसायटी आलमला.

श्री शिवाजी आंबुलगे, उपाध्यक्ष रामनाथ शिक्षण संस्था. श्री प्रभाकर कापसे, सचिव रामनाथ शिक्षण संस्था. प्रा.नंदकुमार धाराशिवे सहसचिव, तसेचसंस्थेचे संचालक सोपान काका अलमलेकर, श्री विरनाथ हुरदळे, सरपंच कैलास निलंगेकर, श्री बसवराज धाराशिवे सचिव श्री विश्वेश्वर शिक्षण संस्था. श्री जयशंकर हुरदळे, माजी संचालक मांजरा शुगर, हे उपस्थित होते. प्रथम मान्यवरांच्या शुभ हस्ते सरस्वती पूजन व संस्थेचे संस्थापक अध्यक्ष स्व. एस.एस. पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन करून दीपप्रज्वलन करून या वार्षिक स्नेहसंमेलनाचे उद्घाटन मान्यवरांच्या शुभहस्ते करण्यात आले. यानंतर संस्थेच्या वतीने मान्यवरांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. तसेच या कार्यक्रमाचे औचित्य साधून संस्थेच्या बिनविरोध झालेल्या निवडणुकीच्या पदाधिकाऱ्यांचाही श्रीमान शंकररावजी पटवारी साहेब यांच्या शुभ हस्ते स्टाफ च्या वतीने सत्कार करण्यात आला. नंतर विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या गाण्यावरती आपली कला सादर केली.यामध्ये विशेष करून बंजारा समाजातील मुलींनी अनेक गाण्यावरती आपल्या बंजारा वेशभूषेमध्ये नृत्य सादर करून प्रेक्षकांची मने जिंकली. याच कार्यक्रमात जिल्हा परिषद रामनाथनगरच्या चिमुकल्यांनीही वेगवेगळ्या गाण्यावरती आपले कौशल्य दाखवून प्रेक्षकांना मोहित केले. ग्रामीण भागातील हा सांस्कृतिक स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम अतिशय दिमाखदार आणि सुंदर पद्धतीने सादर करून मुलांच्या कलागुणांना वाव देण्यात आला. या कार्यक्रमासाठी रामनाथ विद्यालयातील सांस्कृतिक विभागप्रमुख श्री. सूर्यवंशी भास्कर, सौ हिंगणे जे. आर, सौ. निलंगेकर एस. एस, सौ.आमरजा उकरडे श्री.श्याम कोकाटे, फैयाज फाजल, नरसिंग पंडगे, प्रशांत हुरदळे इत्यादी शिक्षक वर्गानी परिश्रम घेतले. या कार्यक्रमासाठी जिल्हा परिषद शालेय समितीचे अध्यक्ष शिवकुमार पाटील, श्री शिवशंकर धाराशिवे, कापसे कैलास, पंचायत समिती औसा माजी सभापती सौ अर्चना गायकवाड, सौ.अनिता पाटील मु.अ. पर्यवेक्षक श्री पी.सी.पाटील रंगनाथ अंबुलगे, शरण धाराशिवे,नलवाडे नितेश इत्यादी कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.या कार्यक्रमासाठी आलमला, सोनपट्टी तांडा,आलमला तांडा, सत्तरधरवाडी,कुलकर्णी तांडा, उंबडगा, रामनाथनगर इत्यादी गावातून नागरिक उपस्थित होते. शेवटी भास्कर सूर्यवंशी यांनी सर्वांचे आभार मानले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी एच.एस.सी.व्होकेशनल व कला विभागाचे सर्व प्राध्यापक, रामनाथ शिक्षण संस्थेतील सर्व कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.