जि.प. प्रशाला आडूळ येथे मराठी भाषा संवर्धन पंधरवड्याचा ग्रंथदिंडीने उत्साहात समारोप

पाचोड(विजय चिडे)

आडूळ येथील जिल्हा परिषद प्रशालेत दि.१४ ते २८ जानेवारी २०२३ या कालावधीत मराठी भाषा संवर्धन पंधरवडा उत्साहात साजरा करण्यात आला.या पंधरवड्यात मराठी भाषेचे आदर्श वाचन,मराठी शुद्धलेखन, घोषवाक्य वाचन-लेखन,कवितालेखन, कथालेखन,प्रश्नमंजुषा,सुंदर हस्ताक्षर लेखन,निबंध स्पर्धा,कविता गायन स्पर्धा,कथाकथन स्पर्धा,वाचन कट्टा निर्मिती,वक्तृत्व स्पर्धा,अंताक्षरी, शब्दकोडी सोडवणे,लेखक व कवी यांचे महितीपत्रक तयार करणे,ग्रंथप्रदर्शन, ग्रंथदिंडी इत्यादी उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

या उपक्रमांत इयत्ता ५ वी ते इयत्ता १० वीच्या विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेऊन मराठी संस्कृती संवर्धनाचा निर्धार केला.शेवटी दि.२८ रोजी शनिवारी विदयार्थ्यांची गावातून 'ग्रंथदिंडी' काढून पंधरवडयाचा समारोप करण्यात आला.याप्रसंगी शाळेच्या मुख्याध्यापिका ज्योती मादनकर,हारुण पठाण,शिवनारायण काळे,कैलास वाढवे,संतोष चव्हाण,अनिल चव्हाण,प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक कैलास व्यवहारे,पंढरीनाथ पाटील,जयसिंग राठोड,कल्पना सोनवणे,वैशाली तारो तसेच शालेय व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी यांची उपस्थिती होती.काढण्यात ग्रंथ दिंडीत पालखित ग्रंथ ठेऊन शिक्षकांसह सर्वच विद्यार्थी पारंपारिक वेशभूषा करून टाळ मृदुंग वाजवित मोठ्या उत्साहाने सहभागी झाले होते.