औसा प्रतिनिधी-शिवसेना संस्थापक बाळासाहेब ठाकरे यांचा दि.२३ जानेवारी हा जयंती दिन असून, जिल्ह्यातील शिवसैनिकांनी सन्वयातून,हा दिवस दिवाळी,दसर्याप्रमाणे विविध समाजोपयोगी उपक्रमांनी साजरा करावा,असे आवाहन उध्दव बाळासाहेबांची शिवसेनेचे लातूर शिवसेना जिल्हाप्रमुख शिवाजीराव माने यांनी येथे केले.
लातूर जिल्ह्यातील- लातूर शहर,निलंगा, व देवणी, शिरूर अनंतपाळ, या तालुक्यातील पदाधिकार्यांच्या नियुक्त्या शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार,शिवसेना नेते चंद्रकांत खैरे व शिवसेना उपनेते मराठवाडा समन्वयक विश्वनाथ नेरुरकर यांच्या सूचनेवरुन, शिवसेना जिल्हाप्रमुख शिवाजी माने यांनी जिल्ह्यातील लातूर शहर विधानसभा हरिभाऊ सगरे(उपजिल्हाप्रमुख,निलंगा विधानसभा,योगेश स्वामी(उपजिल्हाप्रमुख,लातूर विधानसभा),राज लाटे(सहसमन्वयक लातूर जिल्हा),सिद्धेश्वर चव्हाण(विधानसभा प्रमुख लातूर शहर विधानसभा),शिवाजी पांढरे( विधानसभा प्रमुख,निलंगा विधानसभा),मुकेश सुडे(तालुका प्रमुख,देवणी तालुका),बालाजी जाधव( महानगर संघटक लातूर शहर,सुनील बसपुरे(शहरप्रमुख लातूर शहर),दीपक मलभागे(शहरप्रमुख,देवणी शहर),माधव कलमुकले(विधानसभा संघटक लातूर शहर विधानसभा),युवराज वंजारे(विधानसभा समन्वयक लातूर शहर विधानसभा) यांच्या नियुक्त्या दिनांक १३ जानेवारी २०२३ रोजी झाल्या असून, या पदाधिाकर्यांचा मंगळवार,दि.१७ जानेवारी रोजी लातूर येथील जिल्हा बैठकीत मार्गदर्शन करताना ते बोलत होते. याप्रसंगी शिवसेना व्यापारी आघाडीचे जिल्हा समन्वयक तथा बँक कर्मचारी सेना महासंघाचे जिल्हाप्रमुख सी.के.मुरळीकर यांच्यातर्ङ्गे या सर्व नूतन पदाधिकार्यांचा शाल,ङ्गेटा व पुष्पहार घालून सत्कार करण्यात आला.यावेळी पुढे बोलताना माने म्हणाले की पदाधिकर्यांनी कार्यक्षेत्रेयात येणार्या सर्व समस्या बाबत चर्चा करून प्रत्येक गावात शाखा शाखाप्रमुख बूथ प्रमुख गटप्रमुख यांच्या नेमणुका लवकरात लवकर करून घेऊन येणार्या प्रत्येक निवडणुकीमध्ये पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली यश खेचून आणलं पाहिजे आणि ती जबाबदारी जिल्हाप्रमुख म्हणून माझ्यावर दिलेली आहे. मी २४ तास तुमच्या सोबत आहे कोणत्याही परिस्थितीमध्ये औसा विधानसभा आणि निलंगा विधानसभा या दोन्ही मतदारसंघातील आमदार शिवसेनेचेच निवडून आले पाहिजेत. यासाठी अहोरात्र कष्ट करणं गरजेचं आहे याचबरोबर होऊ घातलेल्या जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिका महानगरपालिका या सर्व निवडणुका लढवण्यासाठी नियोजनबद्ध कामाला लागावे,जिल्ह्यातल्या निवडणुका लढवल्या जातील महाविकास आघाडी की स्वतंत्र हा निर्णय पक्षप्रमुख घेतील.यासाठी सर्व पदाधिकार्यांनी नवनियुक्त सर्व पदाधिकार्यांनी गटबाजी न करता वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांचे विचार व त्या विचाराची शिदोरी पाठीशी घेऊन सर्वसामान्य माणसाला न्याय मिळवून द्यावा.
सी.के.मुरळीकर यांनी शिवाजी माने हे जिल्हाप्रमुख झाल्यापासून शिवसेनेमध्ये शिवसैनिकांमध्ये पदाधिकार्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झालेला आहे. ते संघटन कौशल्य व संघटनात्मक बांधणी हा विषय शिवाजी माने यांच्याकडून शिकावा असा आहे. भविष्यात शिवसेना निश्चितच भक्कम होईल,असा विश्वास व्यक्त केला.
या वेळी नवनियुक्त उपजिल्हाप्रमुख हरिभाऊ सगरे व नवनियुक्त शहर प्रमुख सुनील बसपुरे यांनी मनोगत व्यक्त केले.कार्यक्रमाला विष्णू साबदे,त्र्यंबक स्वामी, विष्णुपंत साठे,ऍड.राहुल मातोळकर,रवि पिचारे,बाबुराव शेळके,नारायण माने,प्रिती कोळी, अलका मुगळे,रेखा माने,शरद हुडगे, येळाकुरे,रवि भोसले ,बसवराज मंगरुळे,रफिक नाना,निजाम हुच्चे,तानाजी सुरवसे,सुरेश दादा भुरे,जया उटगे,श्रीराम कुलकर्णी,विनोद आर्य,अविनाश रेशमे,रेखा पुजारी,पांढरे ताई,सगर ताई,प्रसाद मठपती,किसन भोर,नाईकवाडे सुनील,भागवत वंगे,सतीश शिवणे,सरोजा गायकवाड,गोविंद श्रीमंगल,सोशल मिडिया प्रमुख अजय घोणे आदी उपस्थिती होते.
या बैठकीचे प्रास्ताविक शिवसेना तालुकाप्रमुख लातूर बाबुराव शेळके यांनी केले तर आभार प्रदर्शन विष्णू साबदे यांनी केले.