माजलगाव -

तालुक्यातील मोगरा या गावी गुरूवारच्या रात्री झालेल्या ढगफुटीमुळे गावाला जोडणारा पुल वाहुन गेला असुन गावातील विज गायब झाली आहे तर पिण्याच्या पाण्याची देखिल भ्रांत निर्माण झाली आहे. जोरदार बरसलेल्या

पावसामुळे खरिप पिकांचे आतोनात नुकसान झाले आहे. दरम्यान पुल ओलांडतांना एक मच्छिमार महिला वाहुन गेल्याची घटना देखिल घडली आहे. या गावांवर अक्षरशः आभाळ फाटलं आहे असं गावकऱ्यांनी सांगितले .

   मागील आठ दिवसांपासुन गायब झालेला पाउस गुरूवारच्या रात्री चांगलाच सला. गुरूवारी सकाळपासून ढगाळ वातावरण झाले होते. सकाही हलका पाउस बरसलाही होता परंतु काही वेळानंतर आवरणात बदल होउन काळे ढग गायब झाले व उन पडले होते परंतु उन्हामध्ये प्रचंड गर्मी होत होती. सायंकाळी सहा जण्याच्या नंतर शहरासह तालुका परिसरात आभाळामध्ये काळ्या ढगांनी गर्दी करत पावसाचे वातावरण निर्माण झाले. रात्री च्या नंतर जोरदार पावसाला सुरूवात झाली तर मोग-यात ढगफुटी सदृश्य पाउस झाल्याने आलेल्या पाण्यामुळे गावाला डणारा पुल वाहुन गेला. यामुळे काही काळासाठी गावाचा संपर्क तुटला होता तर गोदावरी नदी देखिल भरून वाहत आहे. मुळे ग्रामस्थांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले होते. दरम्यान या पावसामुळे मोगरा गावात वाताहात निर्माण झाली सुन गावातील विज गायब आहे तर बोअर, विहीर नसल्याने गावात पिण्याच्या पाण्याची बोंबाबोंब होत आहे तर पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असल्याने महसुल प्रशासनाने गावाची पाहणी करावी अशी मागणी ग्रामस्थांमधुन होत आहे. दरम्यान पुल लांडतांना मच्छिमार महिला सोनाली सखाराम बिजुले वाहुन गेली परंतु या महिलेस पोहता येत असल्याने आणि हिमंतवत ओढ्यातुन गोदावरी नदीपात्राच्या किना-याला येत सदरील महिला बालंबाल बचावली.असल्याने गावकऱ्यांनी सुटकेचा श्वास सोडला आहे