शिक्रापूरात आझाद समाज पार्टीच्या अध्यक्षावर दगडफेक

एका वकीलासह दोघांवर ॲट्रॉसिटी प्रकरणी गुन्हे

( शिक्रापूर प्रतिनिधी ) शिक्रापूर ता. शिरूर येथे आझाद समाज पार्टीच्या शिरूर तालुका महिला अध्यक्षाला शिवीगाळ दमदाटी करत त्यांच्यावर दगडफेक करुन जीवे मारण्याची धमकी देत सोशल मीडियावर बदनामीकारक पोस्ट टाकल्याची घटना घडल्याने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे ॲड. केदार खंडेराव शितोळे, केतन खंडेराव शितोळे व खंडेराव शितोळे या तिघांवर ॲट्रॉसिटी सह आदी गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

                          शिक्रापूर ता. शिरूर येथील पाटवस्ती येथे डॉ. महेश खिलारे यांचे हॉस्पिटलचे बांधकाम सुरू असून त्यांच्या शेजारी असलेले ॲड. केदार शितोळे, केतन शितोळे व खंडेराव शितोळे हे तिघे डॉ. खिलारे यांच्या बांधकामाला विरोध करत असल्याने डॉ. खिलारे यांनी आझाद समाज पार्टीच्या महिला शिरूर तालुकाध्यक्षा सुरेखा गायकवाड यांना याबाबत सांगितल्याने ३ जानेवारी २०२३ रोजी सुरेखा गायकवाड यांनी काही महिला कार्यकर्त्यांसह डॉ. खिलारे यांच्या बांधकामाजवळ जात ॲड. केदार शितोळे व अन्य लोकांना बांधकाम करु द्या असे समजावून सांगण्याचा प्रयत्न केला त्यावेळी ॲड. केदार शितोळे, केतन शितोळे व खंडेराव शितोळे यांनी सदर महिलांना शिवीगाळ, दमदाटी करत जातीवाचक बोलून आझाद समाज पार्टीच्या शिरूर तालुकाध्यक्षा सुरेखा गायकवाड यांच्यासह अन्य महिला कार्यकर्त्यांच्या दिशेने दगडफेक करून जीवे मारण्याची धमकी दिली, घडलेला सर्व प्रकार सुरेखा गायकवाड यांनी आझाद समाज पार्टीच्या पुणे जिल्हा महिलाध्यक्षा स्वाती गायकवाड यांना सांगितला, मात्र त्यानंतर ९ जानेवारी २०२३ रोजी ॲड. केदार शितोळे याने फेसबुक वर सदर महिलांसह डॉक्टर बाबत आक्षपार्ह पोस्ट टाकली सदर पोस्ट एका कार्यकर्त्याने आझाद समाज पार्टीच्या पुणे जिल्हाध्यक्षा स्वाती गायकवाड यांना पाठवला त्यामुळे याबाबत आझाद समाज पार्टीच्या महिला पुणे जिल्हाध्यक्षा स्वाती विलास गायकवाड वय ३५ वर्षे रा. ताडीवाला रोड मारुती मंदिर जवळ पुणे यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली असल्याने शिक्रापूर पोलिसांनी ॲड. केदार खंडेराव शितोळे, केतन खंडेराव शितोळे व खंडेराव शितोळे तिघे रा. पाट वस्ती शिक्रापूर ता. शिरूर जि. पुणे या तिघांवर ॲट्रॉसिटी, शिवीगाळ, दमदाटी सह आदी गुन्हे दाखल केले असून पुढील तपास शिरूर उपविभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी यशवंत गवारी व पोलीस हवालदार चंद्रकांत काळे हे करत आहे.