राज्यस्तरीय कॅरम स्पर्धेसाठी अल्फाज पठाणची निवड

औसा प्रतिनिधी - महाराष्ट्र राज्य युवा सेवा संचालनालय व लातूर जिल्हा क्रीडा कार्यालयाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या 17 वयोगट कॅरम स्पर्धेत अल्फाज पठाणचे यश जिल्हा परिषद प्रशाला,भादा वर्ग 10वी मध्ये शिकत आहे, गेल्या 27 नोव्हेंबर 2022 मध्ये जिल्हा क्रीडा संकुल लातूर येथे कॅरम स्पर्धेत कौशल्य दाखवत आपले जिल्हास्तरीय स्पर्धेत तृतीय क्रमांक मिळवून विभागस्तरासाठी पात्र ठरला, नंतर 12 डिसेंबर2022 मध्ये गुरूगोविद सिंह क्रीडा संकुल नांदेड येथे पार पडलेल्या विभागस्तर कॅरम स्पर्धेत प्रयत्न ची पराकाष्ठ करत,प्रयत्न करता वाळूचे कण रगडीता तेलही गळे,या उक्ती प्रमाणे चारही राऊंड मध्ये आपली कला दाखवत अग्रेसर ठरला, व 17 वयोगट विभागीय कॅरम स्पर्धेत प्रथम क्रमांकाचा मानकरी होऊन राज्य स्तरीय स्पर्धा साठी निवड झाली.येत्या 15 व 16 जानेवारी 2023 रोजी होणाऱ्या स्पर्धा विट्टलराव जोशी, चॅरीटीज ट्रस्ट चे क्रीडा संकुल,डेरवण, सावर्डे ता. चिपळूण जि. रत्नागिरी येथे सहभागी होत आहे,अल्फाज पठाण या यशाबद्दल शाळेचे मुख्याध्यापक मोहन माकणे, सर्व शिक्षक व शिक्षिका, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष, इस्माईल मुलांनी,उपअध्यक्ष बाळासाहेब जाधव,उपसरपंच बालाजी शिंदे, अल्फाज पठाणचे बंधू आजू पठाण, वडील प्यार महंमद पठाण, ग्रामस्थ यांनी कौतुक केले.