अनंत श्री विभूषित जगद्गुरू रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्राचार्यजी महाराज, दक्षिण पीठ नाणीजधाम लोहा शहरामध्ये गुरुवार , दि. १२ जानेवारी रोजी लोहा सायाळ रोड येथे सकाळी ठीक 10 वाजता पादुका दर्शन व प्रवचन दर्शन सोहळ्याचे भव्य आयोजन करण्यात आले असून भव्य शोभायात्रा, सिध्दपादुका पूजन, सामाजिक उपक्रम, प्रवचन व दर्शन, उपासक दीक्षा आदि कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून. या सोहळ्यासाठी भाविकांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन या सोहळ्चा आनंद घेण्याचे आवाहन उत्सव समिती, जिल्हा सेवा समिती नांदेड.यांनी केले. ज्याने गुरू नाही केला, त्याचा जन्म वाया गेला. जगद्गुरू श्री नरेंद्राचार्यजी महाराज व्यक्ती नसून एक शक्ती आहे. त्यांनी दिलेल्या शिकवणीचे तंतोतंत पालन केल्याने जीवन सार्थकी बनते. भक्ती, संतसंग, गुरुसेवा, व्यसनमुक्ती,रस्त्यावरील अपघात झालेल्या व्यक्तीला मोफत २४ तास रुग्ण वाहिका सेवा दिली जाते. अशे अनेक उपक्रम जगद्गुरु नरेंद्राचार्यजी महाराज यांच्या संस्थानातर्फे राबविले जातात. सर्वांनी नचुकता कार्यक्रमास उपस्थित रहावे.

असे आव्हान जिल्हा सेवा समिती नांदेड यांनी केले. जिल्हा निरीक्षक काकासाहेब वनारसे, जिल्हा सेवा अध्यक्ष हौसाजी पाटील कदम, संभाजी पाटील माऊलीकर, उत्सव सेवा समिती अध्यक्ष हनुमंत पवार, भारत रॉपावाड काका, महिला अध्यक्ष संगीता अडकिने, युवा अध्यक्ष रवी शहाणे, देणगी प्रमुख पिंटू सुरनर, आजी-माजी सर्व पदाधिकाऱ्यांनी आव्हान केले.