मालेगांव तालुक्यातील बोर्डी- कोल्ही ग्रामपंचायतील सरपंच पदाचे उमेदवार बोर्डी येथील समाजिक कार्यकर्ते तुळशीराम रामकिसन चव्हान हे विजयी झाले आहेत संबोधित जनतेला अभिवादन तथा विनम्र पूर्वक आभार प्रकट करताना तुळशीराम चव्हान म्हणाले की,माझ्या गावातील सर्व मतदारांनी माझ्यावर विश्वास दाखवून तब्बल शतकी मतानि माझा विजय केला मी या विजयाला व्यर्थ जाऊ देणार नाही माझ्या गावाचा सर्वांगीण विकास हेच माझे ध्येय आहे मी मतदानात जे जनतेला आव्हान केले आहे ते सर्व पूर्ण करणार आहे. माझ्या गावातील माझ्या गावातील कार्यकर्त्याचा मी विकासाचा विचार् करणार आहे. माझी निवडनुक ही वैचारिक मुद्यावर होती. निवडणूक संपली ते मुदे मी माझ्या कार्य किर्दीत पूर्ण करणार आहे. माझ्या गावखेड्यातील सर्वांनी मला गावाच्या विकासाचा विचार करून पाठिंबा दिला. त्यान्चा मी आभारी आहे त्यांच्या मार्गदर्शना खाली मी गावाच्या विकासात भर घालणार आहे मी पुन्हा एकदा माझ्या गावातील सदस्य,तथा मतदारांचे खूप खूप आभार मानतो. आपल्या गावातील प्रत्येक सरपंच पदाचे उमेदवार आणि मेंबर तसेच त्यांचे कार्यकर्ते यांनी खूप शांतपूर्ण आणि कुठलेही मतभेद न करता कोणाशी ही वाद न घालता निवूडणुक पार पाडली. त्याबद्दल खूप खूप आभार आणि माझ्या अंतकरणाने निवडून येणाऱ्या सर्व उमेदवारांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि अभिनंदन! आणि ग्रामपंचायत निवडणूक हा खेळ आता संपला आहे.आता कोणीही कोणाचा विरोधक नसणार.अशी अपेक्षा व्यक्त करतो कारण गावपातळीवर प्रत्येक नागरिकाला ग्रामपंचायत लढवण्याचा अधिकार आहे. तसेच प्रत्येक मतदाराला त्याचे अनमोल मत कोणाला दान करायचे आहे. हा त्याचा अधिकार आहे,त्यामुळे आता जो कोणी उमेदवार निवडून येईल तो कोणत्याही जाती,धर्माचा आणि विशिष्ट,श्रीमंत व्यक्तीचा विचार न करता फक्त गावाच्या जनतेच्या हिताचा आणि गाव कल्याणाचा विचार करेल आनि गावाच्या हिताचे विकास कामे करण्यासाठी असेल.

Sponsored

महावीर कुल्फी सेन्टर - बूंदी

महावीर कुल्फी सेन्टर की और से बूंदी वासियों को दीपावली की हार्दिक बधाई व शुभकामनाएं