शिक्रापूर ता. शिरुर येथील कळमकर वस्ती येथे शिवगंगा कॉम्प्लेक्स मध्ये राहणारे भारत टेकाडे व अर्चना टेकाडे दोघे रविवारी दुपारच्या सुमारास कामानिमित्ताने बाहेर गेलेले होते, सायंकाळच्या दरम्यान दोघे पुन्हा घरी आले असताना त्यांना दरवाजाचे कुलूप तुटलेले व कडी उघडी दिसली म्हणून त्यांनी घरात जाऊन पाहणी केली तेव्हा सर्व साहित्य अस्ताव्यस्थ आणि कपाट उघडे असल्याचे दिसले त्यामुळे त्यांनी कपाटाची पाहणी केली असता कपाटातील चार तोळे सोन्याचे दागिने व पाच हजार रुपये रोख रक्कम असा अंदाजे दोन लाखांचा ऐवज चोरीला गेल्याचे दिसून आले, याबाबत भारत नारायण टेकाडे वय २९ वर्षे रा. कळमकरवस्ती शिक्रापूर ता. शिरुर जि. पुणे मूळ रा. बेराळा ता. चिखली जि. बुलढाणा यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली असल्याने शिक्रापूर पोलिसांनी अज्ञात चोरट्यावर गुन्हे दाखल केले असून सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन अतकरे व पोलीस नाईक रोहिदास पारखे हे करत आहे.

Sponsored

महावीर कुल्फी सेन्टर - बूंदी

महावीर कुल्फी सेन्टर की और से बूंदी वासियों को दीपावली की हार्दिक बधाई व शुभकामनाएं