हिंगोली जिल्ह्यात यावर्षी अतिवृष्टीमुळे शेतीपिकाच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून या वर्षी पिकवीमा भरुनही पिकवीमा कंपनी कडुन चुकीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई पोटी अपुरी मदत मिळाली तर अनेक शेतकऱ्यांना अद्यापही पिकवीमा मिळाला नसल्याने स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक झाली असुन आज गोरेगाव येथुन हजारो शेतकरी आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी राज्यमंत्री रविकांत तुपकर यांच्या नेतृत्वात भव्य मोर्चा काढण्यात आला होता जो पर्यंत शेतकऱ्यांना नुकसान भरपाई पोटी पिकवीमा मिळत नाही तो पर्यंत अम्ही कृषी अधिकारी कार्यालयावरील ताबा सोडणार नाही असा पवित्रा स्वाभिमानी शेतकरी संघटनेने घेतला होता लेखी आश्वासनानंतर आंदोलन मागे घेण्यात आले या आंदोलनात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी राज्यमंत्री रविकांत तुपकर, हिंगोली परभणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे उपाध्यक्ष राजेश भैय्या पाटील, माजी महीला व बालकल्याण सभापती रुपाली ताई पाटील, गजानन प्रकाश कावरखे, नामदेव पतंगे याच्यासह हजारोंच्या संख्येने शेतकरी उपस्थित होते.