वनिता वासवी संस्कृति क्लबच्या वतीन श्रावण उत्सव
हिंगोली वासवी संस्कृति क्लब हिंगोलीच्या वतीने श्रावण उत्सवानिमित्त नागपंचमी, मैत्री दिन, श्रावण उत्सव साजरा करण्यात आला. यावेळी पवित्र श्रावण महिन्याच्या औचित्याने उत्सव साजरा करण्यात आला.
हिंगोली येथील वनिता वासवी संस्कृति क्लबच्या वतीने छत्रपती शिवाजी राजे उद्यान एनटीसी परिसरात श्रावण उत्सवाचे आयोजन नुकतेच करण्यात आले. पवित्र श्रावण महिन्याचे औचित्य साधुन श्रावणी वृत्त करण्यात येते. नागपंचमी निमित्त झुला झुलण्याचा, मेहंदी मांडणे व मैत्री दिनाच्या निमित्ताने लहानपणीचा उजाळा देत झुकझुक गाडी, तळयात मळयात आणि धमाल गाणी व विविध खेळ, ओरक्षण उत्तरे या कार्यक्रमात महिला भगिंनी मोठया संख्येने सहभागी झाल्या होत्या. यावेळी क्लबच्या अध्यक्षा प्रणिताताई कौलवार, उपाध्यक्षा संगिताताई मामडे, श्रृतीताई बासटवार, सचिव रुपालीताई काप्रतवार, कोषाध्यक्षा शिल्पाताई गुंडेवार व वनिता वासवी संस्कृति क्लबच्या सदस्य महिलांनी परिश्रम घेतले.