पाचोड महसुल मंडळातून जेसीबीच्या सहाय्याने मुरूम उत्खनन

Sponsored

ओम धगाल - पूर्व प्रदेश कार्यकारिणी सदस्य भाजपा युवा मोर्चा

ओम धगाल की और से हिंडोली विधानसभा क्षेत्र एवं बूंदी जिले वासियों को रौशनी के त्यौहार दीपावली की हार्दिक बधाई व शुभकामनाएं

"अवैध मुरूम उपसामुळे सरकारला लाखोंचा फटका"

पाचोड(विजरा चिडे) पैठण तालुक्यातिल पाचोड महसुल मंडळात मोठ्या प्रमाणावर मुरूमाचा अवैधरित्या उत्खनन सुरू असून या उत्खननावर महसूल अधिकाऱ्यांचे अभय मिळत असल्याने सरकारला मात्र कोट्यवधी रुपयांच्या महसुलावर पाणी सोडावे लागत आहे. सरकारला कोट्यवधी रुपयांचा महसूल देणारा गौण खनिज विभाग मात्र या अवैध मुरूम उपशावर जाणीवपूर्वक ‘अर्थपूर्ण’ डोळे झाक करीत असल्याचे दिसून येत आहे.

गौण खनिज विभागामार्फत मुरूमाच्या राॅयल्टी द्वारे विभागाला कोट्यवधी रुपयांचा महसूल मिळतो. मात्र अवैध मुरूम उपसा केल्याने सरकारला फटका बसतो. बांधकामांचे प्रमाण वाढल्याने अवैध मुरूम उत्खननाच्या प्रकरणात वाढ झाली आहे. स्थानिक महसूल प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे सर्रास मुरुम उपसा सुरू असल्याच्या तक्रारी मोठ्या प्रमाणात आहेत. मात्र अधिकारी व कर्मचारी तक्रारी कडे दुर्लक्ष करतात.पाचोडसह मुरमा,थेरगाव,लिबगाव,कोळीबोडखा येथील गायरान जमीनीतून अवैध गौण खनिज मुरूमाचे  उत्खनन मोठ्या प्रमाणात होत आहे.येथून लाखो ब्रास मुरुम उपसा केला जात.

या प्रकरणी महसुल विभागाने दुर्लक्ष केले आहे.याचाच अर्थ महसूल विभागाचे अधिकारी मूरूम उपशास अभय देत असल्याचे नागरिकांकडून बोलले जात आहे.विशेष म्हणजे सूर्यास्त नंतरही अवैध गौण खनिज वाहतूक या परिसरातून लाखो ब्रास गौण खनिज उत्खनन केले जात आहे. विशेष म्हणजे ट्रँक्टर,हायवा वाहनातून दिवसा मुरमाची वाहतूक केली जात आहे. मुरूम माफियांची मोठी साखळी निर्माण झाली आहे. 

प्रशासनातील काही अधिकारी व कर्मचार्‍यांना हाताशी धरून अवैध गौण खनिज उत्खननाचा धंदा सुरू आहे. या प्रकारामुळे गौण खनिज संपत्ती नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. प्रशासनाचे सर्व नियम व कायदे मोडले जात आहेत. याकडे प्रशासनाने दुर्लक्ष होत असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.दरम्यान, एकीकडे प्रशासन महसूल वाढावा म्हणून कडक कारवाई करीत असतानाच दुसरीकडे मात्र चोरट्या मागार्ने अवैध उत्खनन करून प्रशासनाचा लाखो रुपयांचा महसूल बुडविला जात आहे.