बीड प्रतिनिधी- बीड तालुक्यातील अतिशय महत्त्वाची आणि मोठी असलेली चौसाळा ग्रामपंचायत आणि या ग्रामपंचायतला वसलेली विकासाची खेळ दूर करण्यासाठी मतदान रुपी आशीर्वाद द्या सर्वांगीण विकास करतो असे आवाहन बाबुशेठ लोढा यांनी माध्यमांद्वारे केले आहे
चौसाळा शहरातील अनेक असलेले दुर्लक्षित प्रश्न, पाणी, विद्युत, शेतकऱ्यांचे प्रश्न, आरोग्याचे प्रश्न, याशिवाय घरकुलाची प्रश्न, संजय गांधी निराधार योजनेच्या माध्यमातून गोरगरिबांना त्यांच्या पगारी चालू करण्याचे प्रश्न ,घरकुलाचे प्रश्न, तातडीने मार्गी लावण्याचे वेळप्रसंगी प्रशासनाला विनंती करून वरील प्रश्न मार्गी लावायचा संकल्प केला आहे. चौसाळा निवडणूक अतिशय तुळशीची होत आहे चौसाळा शहराचा चेहरा मोहरा बदलण्याचा देखील आम्ही संकल्प केला आहे चौसाळा ग्रामपंचायत च्या सरपंच पदासाठी बाबुशेठ लोढा यांच्या पत्नी उमेदवार आहेत मतदारांनी आता मतदान रुपी आशीर्वाद देऊन गावकऱ्यांची सेवा करण्याची संधी द्यावी असे मत बाबुशेठ लोढा यांनी व्यक्त केले आहे.