मालेगांव येथील नाना मुंदडा विद्यालयाचा वर्ग 10 वी चा विद्यार्थी शालेय क्रीडा स्पर्धेमध्ये जिल्हास्तरावर प्रथम आला असून त्याची निवड आता विभागीय स्थरा करता झालेली आहे पुढील महिन्यात तो विभागीय स्तरावर खेळण्यासाठी जाणार आहे.

            गेल्या महिनाभरापासून विविध क्रीडा स्पर्धा मध्ये शालेय क्रीडा स्पर्धा होत आहेत त्यामध्ये मुंदडा विद्यालयाचे अनेक विद्यार्थी जिल्हा स्तरावर गेलेले आहेत तर एक विद्यार्थी आयुष दिलीप इंगळे हा विभागीय स्तरावर गेला आहे. तो भालाफेक मध्ये जिल्ह्यचे नेतृत्व करणार आहे.तर जिल्हास्तरावर वैभव खाडे, योगीराज टाले विवेक देशमुख ,कल्याणी खंडारे, अनिकेत गायकवाड ,प्रेम कुमार आंभोरे ,आयुष इंगळे, प्रथमेश तायडे ,आशुतोष नपते वेदांत बांगरे, अरुण शिंदे हे विविध क्रीडा स्पर्धा मध्ये जिल्हास्तरावर पोहोचलेले आहेत. त्यांना मुंदडा विद्यालयाचे क्रीडा शिक्षक महेश महाले व क्रीडा शिक्षिका सौ अश्विनी बयस यचं मार्गदर्शन लाभले आहे. त्यांचे सर्व स्तरावर कौतुक करण्यात येत आहे.