अंधार कोठडीचे जग का? व कोणी म्हटले ?मनुष्य हा एक प्राणी आहे.जीवनसृष्टी मध्ये तो मात्र सर्वश्रेष्ठ स्थानी आहे.कारण मानवाजवळ विकसित मेंदू आहे. त्यामुळे विकसित बुद्धिमत्ता मानवाजवळ आहे. या बुद्धिमत्तेच्या जोरावर त्यांनी मानवी सहजीवन आणि त्यातूनच मानवी संस्कृती अस्तित्वात आणली आहे.सामूहिक जीवन जगत असताना तो इतका रमून गेला आहे, की खऱ्या जीवन मार्गाचा तो खरा मार्गच विसरला आहे त्यामुळेच धम्ममार्गापासून पुन्हा एकदा हा मानवी समूह दूर जात असलेला दिसत आहे. भौतिक सुभवता क्षणिक आहे अल्पजीवी आहे, त्याचे भान मानवाला राहिलेले नाही.म्हणूनच अधिकांश जनता अविद्येने ग्रषित आहे. अज्ञान अंधकाराचं जीवन जगत आहे. मानवी जीवनाची ही दुर्दशा अतिशय वेदनाकारक आहे आणि भविष्याकरिता दुःखदायी आहे. या समाजाला अशा अंधाकारातून अंधाकाराच्या युगातून केवळ तथागताचा धम्मच वाचवू शकतो. म्हणूनच बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथातून बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे सम्मक दृष्टी या अष्टांगिक मार्गाचा प्रथम अंगाला स्पष्ट करताना सांसरिक जगाचे चित्रण मांडताना या जगाला अंधार कोठडी म्हणून संबोधतात. संपूर्ण जग अंधार कोठडीप्रमाणे असल्यामुळे तो अविद्येने ग्रषीत आहे या अंधार कोठडीला प्रज्ञेच्या प्रकाशाची गरज आहे. अर्थात सम्यक दृष्टीची आवश्यकता आहे.मानवाला समय दृष्टी लाभेल तेव्हाच तो धम्माचा प्रकाश पाहू शकेल.
......अनिल तायडे ता.अध्यक्ष भारतीय बौद्ध महासभा मालेगाव