थोर संत किसन बाबा यांच्या पुण्यतिथी निमित्त श्री क्षेत्र गोरक्षनाथ टेकडी येथे अखंड हरिनाम सप्ताह
ओम धगाल - पूर्व प्रदेश कार्यकारिणी सदस्य भाजपा युवा मोर्चा
ओम धगाल की और से हिंडोली विधानसभा क्षेत्र एवं बूंदी जिले वासियों को रौशनी के त्यौहार दीपावली की हार्दिक बधाई व शुभकामनाएं
बीड/घाटसावळी -विसाव्या शतकातील थोर संत किसन बाबा यांच्या २४ व्या पुण्यतिथीनिमित्त श्री क्षेत्र गोरक्षनाथ टेकडी येथे मठाधिपती हभप नवनाथ बाबा यांच्या मार्गदर्शनाखाली श्रावण शुद्ध अष्टमी दि ०५ / ०८ / २०२२ शुक्रवार रोजी या अखंड हरिनाम सप्ताहास प्रारंभ होत असुन श्रावण शुद्ध पोर्णिमा , दिं १२ / ०८ / २०२२ शुक्रवार रोजी दुपारी रामायणाचार्य ह भ प संजय महाजन पाचपोर यांचं काल्याचे किर्तन होईल व नंतर भक्तांना महाप्रसादाच वाटप करण्यात येऊन या सप्ताहाची सांगता होईल . या अखंड हरिनाम सप्ताहात राज्यातील किर्तनकार , गायक , गवळणीगायक , भारुडकारांची उपस्थिती राहणार आहे तरी या अशी विनंती गोरक्षनाथ टेकडी भक्तगण मंडळी ने केली आहे . बीड परळी राज्य महामार्गावर निसर्गाच्या कुशीत वसलेल्या श्री क्षेत्र गोरक्षनाथ टेकडी येथे विसाव्या शतकातील थोर संत किसन बाबा यांच्या पुण्यतिथी निमित्त मठाधिपती महंत नवनाथ बाबा यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या २३ वर्षापासुन अखंड हरिनाम सप्ताह चे आयोजन करण्यात येते . राज्यातून भाविकांची श्रद्धा बाबांवर असल्यामुळे खुप मोठा जनसमुदाय या सप्ताहास येतो . दिनाक ०५ / ०८ / २०२२ शुक्रवारी दुपारी १२ वाजता अनेक मान्यवर मंडळी अखंड हरिनाम सप्ताहाचा लाभ घ्यावा महाराज मंडळी तसेच भक्तांच्या उपस्थितीत होणार आहे . हभप रामेश्वर महाराज दराडे यांच प्रवचन व रात्री ह भ प तुकाराम महाराज मुंडे शास्त्री यांचे किर्तन होईल . दि ०६ | शनिवारी दुपारी हभप | माधव महाराज डाके यांचं प्रवचन व रात्री ह भप ज्ञानेश्वर माऊली महाराज तांबे यांच किर्तन होईल . दिं ७ | रविवारी स्वामी अखंडानंदगीरी • महाराज यांच प्रवचन व रात्री ह भ प पुरूषोत्तम महाराज पाटील यांचं किर्तन होईल . दिं ८ सोमवारी ह भ प ज्ञानेश्वर माऊली महाराज बादाडे यांचं प्रवचन व रात्री हभप रामेश्वर महाराज शास्त्री यांचे किर्तन होईल . दि ९ मंगळवारी हभप वैकुठ याशी चोरत शंकर महाराज चिंचकर यांचं प्रवचन व रात्री हभप नारायण महाराज पालमकर यांचं किर्तन होईल . दिं १० बुधवारी ह भ प वासुदेव महाराज सुरवसे यांचं प्रवचन व रात्री ह भ प स्वामी मनिषानंद पुरीजी यांचं किर्तन होईल . दिं ११ गुरूवारी ह भ प बाबासाहेब महाराज राऊत यांच प्रवचन व रात्री रामायणाचार्य हभ परामराव महाराज ढोक यांचं किर्तन होईल . दि १२ शुक्रवार रोजी दुपारी रामायणाचार्य ह भ प संजय महाजन पाचपोर यांचं काल्याचे किर्तन होईल व नंतर भक्तांना महाप्रसादाच वाटप करण्यात येईल . या अखंड हरिनाम सप्ताहास भाविक भक्तांनी उपस्थित राहण्याची विनंती गोरक्षनाथ टेकडी पंचक्रोशीतील भाविक भक्तांनी केली आहे .