१३ ग्रामपंचायतींसाठी ८० टक्के मतदान 

 बीड : बीड , गेवराई व अंबाजोगाई तालुक्यांतील एकूण १३ ग्रामपंचायतींसाठी गुरुवारी मतदान झाले . तिन्ही तालुक्यांमध्ये एकूण ८०.८५ टक्के मतदान झाले असून पुरुष व स्त्री अशा एकूण १८,३११ मतदारांनी आपला हक्क बजावला . शुक्रवारी मतमोजणी होणार आहे . बीड तालुक्यातील गवळवाडी , अंथरवणप्रिंप्री - गणपूर व अंथरवणपिंप्री तांडा , गेवराई तालुक्यातील दिमाखवाडी , सिरसमार्ग , पाचेगाव , वसंतनगर तांडा , जय रामनाईक तांडा , अंबाजोगाई तालुक्यातील मोरेवाडी चनई , लोखंडी सावरगाव , दगडवाडी व श्रीपतरायवाडी याठिकाणी गुरुवारी मतदान झाले . सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० यावेळेत मतदान आज होणार मतमोजणी तिन्ही तालुक्यांच्या तहसील कार्यालयात शुक्रवारी मतमोजणी होणार आहे . सकाळी १० वाजता निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत मतमोजणीची प्रक्रिया पार पडणार आहे . प्रक्रिया पार पडली . तिन्ही तालुक्यांतील ८,६३० महिला तर ९ , ६७३ पुरुष अशा एकूण १८,३११ मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला . तिन्ही तालुक्यांमध्ये एकूण ८०.८५ टक्के मतदान झाले . बीड तालुक्यात ९ १.३८ टक्के , अंबाजोगाई तालुक्यात ७७.१८ टक्के तर गेवराई तालुक्यात ८२.५० टक्के मतदान झाले . मतदान केंद्रांवर तगडा पोलीस बंदोबस्त होता .