सणसवाडीत पुतण्याने पाडला चुलत्याचा दात
जमिनीच्या वादातून चुलता पुतण्यामध्ये हाणामारी
( शिक्रापूर प्रतिनिधी ) सणसवाडी ता. शिरुर येथे जमिनीच्या वाटपाच्या वादातून चुलता पुतण्यामध्ये हाणामारी झाल्याची घटना घडली असून यावेळी पुतण्याने चक्क चुलत्याचा दात पाडला असून दोघांनी परस्परविरोधी तक्रारी दिल्याने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे विजय बाळासाहेब भुजबळ व काळूराम विठ्ठल भुजबळ या दोघांवर परस्पर विरोधी गुन्हे दाखल करण्यात आले आहे.
सणसवाडी ता. शिरुर येथील बाळासाहेब भुजबळ, विठ्ठल भुजबळ, मोहन भुजबळ यांच्या जमिनीचे वाटपपत्र करण्याचे काम सुरु असताना विठ्ठल भुजबळ त्यासाठी सह्या करण्यात तयार नाहीत मात्र विठ्ठल भुजबळ यांनी सदर जागेमध्ये दुकान चालू केलेले असून त्याबाबत विचारणा करण्यासाठी बाळासाहेब यांचा मुलगा विजय गेला असता दोघांमध्ये वादावादी झाली त्यावेळी दोघांनी एकमेकांना शिवीगाळ करत मारहाण केली असून यावेळी विठ्ठल यांनी विजय यास चावा घेतल्याचे तर विजय याने विठ्ठलयांचा दात पाडल्याचे विठ्ठल यांनी म्हटले असून याबाबत विजय बाळासाहेब भुजबळ व काळूराम विठ्ठल भुजबळ दोघे रा. नरेश्वर रोड सणसवाडी ता. शिरुर जि. पुणे यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे परस्परविरोधी फिर्यादी दिल्या असल्याने शिक्रापूर पोलिसांनी दोघांवर परस्परविरोधी गुन्हे दाखल केले असून पुढील तपास पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक वेरननाथ मुत्तनवार हे करत आहे.