नावातच जय आणि सामान्यांसाठी दत्त म्हणून हजर असणारा लोकनेता

 जनाधार पाठीशी असल्याशिवाय नेतृत्व दीर्घकाळ टिकत नाही.सत्ता हे विकासाचे साधन म्हणून जे उपयोगी आणतात त्यांच्याच पाठीशी जनता भक्कमपणे कायम उभी राहते , असे एकमेव नेतृत्व संयमी आणि अभ्यासू नेतृत्व म्हणून ज्यांच्याकडे पाहिले जाते ते आहेत माजी मंत्री मा. श्री. जयदत्तअण्णा क्षीरसागर . विविध विषयांवर भाषेवर अभ्यास आणि प्रभुत्व असणाऱ्या अण्णांची कार्यशैली ही इतर कोणत्याही नेत्यापेक्षा वेगळी आहे. एखादा माणूस जेव्हा आपली समस्या किंवा प्रश्न घेऊन येतो तेव्हा आपलेपणाने,आत्मीयतेने समजून घेऊन जेव्हा ते प्रश्न सोडवतात तेव्हा सामान्य माणूस त्यांचा कायमचा होऊन जातो. कामे करताना त्यांनी आपली वेगळी अशी स्वतंत्र यंत्रणा कार्यान्वित केलेली आहे,थोडक्यात म्हणजे ही टीम अण्णा. त्यांनी सांगितले अन यांनी केले अशीच ही अण्णांची टीम आहे. आण्णाकडे येणारा मनुष्य हा कोणत्या पक्षाचा,जातीचा ,धर्माचा किंवा कोणत्या पक्षाचा आहे हे कधीच बघितले जात नाही हे विशेष. अण्णांचे सच्चेपण हे त्यांचे वैशिष्ट्य आहे,काम होणार असेल तर ते होच म्हणतात आणि होणार नसेल तर हे शक्य नाही असे स्पष्ट सांगतात,येणारा हा काम व्हायलाच हवे या आशेने येतो त्यामुळे त्याची समस्या समजून घेऊन तात्काळ उपस्थित असलेल्या टीम मधील व्यक्तीला ते लगेच आदेशीत करतात आणि आलेल्या माणसाचे काम करतात,बीड शहरच नव्हे मतदार संघ आणि जिल्ह्यातून अनेकजण आपल्या कामासाठी आण्णाकडे येतो याचा अनुभव घ्यायचा असेल तर त्यांच्या सम्पर्क ऑफिस मध्ये थोडावेळ घालवून बघावे .एकदा खुर्चीवर बसले तर किमान 8 ते 10 तास कुठलाही थकवा न जाणवू देता प्रत्येकाला ते भेटतातच,काहीजण न होणारे काम सुद्धा आग्रहाने करण्याची विंनती करतात तेव्हा " माझी माय थोडं समजून घे हे होत नसते " असे बोलून त्यालाही समजून सांगतात. सामान्य तर येतोच पण व्यापारी,उद्योजक,सांस्कृतिक,कला क्रीडा राजकीय,अशा विविध क्षेत्रातील माणसाची गर्दी ही आण्णा भोवती सतत असते.आपल्या कार्यक्रमास अण्णांनी आलेच पाहिजे असा आग्रह धरणारे देखील अनेक चाहते आहेत त्यांच्या भावनांची कदर करत तिथे हजर राहून समाधान ते नक्की करतात,धार्मिक क्षेत्रात जिथे जिथे सप्ताह किंवा अन्य कार्यक्रम असतो तिथेही संत महंत यांच्या उपस्थितीत धार्मिक विषयावर विस्तृत बोलतात,व्यासपीठावर बोलताना अण्णांनी सतत सकारात्मक विचार मांडले आहेत त्यांनी कधी कुणाचे नाव घेऊन टीकाटिप्पणी कधी केल्याचे आजपर्यंत तरी ऐकिवात नाही,आपली स्वतःची एक मर्यादा असते ती ते सतत पाळतात, एखादा विषय जाणून घ्यायचा असेल तर त्याचा परिपूर्ण अभ्यास झालाच पाहिजे हा त्यांचा स्वभाव लगेच जाणवतो,ते नेहमी म्हणतात ' दुसऱ्यांनी काय केले न केले यापेक्षा आपण काय केले हे जनतेसमोर मांडत राहायचे, यश अपयश हे आपल्या कामावरच अवलंबून असते '. म्हणूनच आण्णाकडे गरीब असो की श्रीमंत प्रत्येकजण आपले काम घेऊन येतो आणि सोडवणूक करून घेतो,

नावातच जय आणि सामान्यांसाठी दत्त म्हणून सदैव तत्पर असणारे हे नेतृत्व जनतेने जपायला हवे . 

 आदरणीय अण्णांना 

वाढदिवसानिमित्त

 लक्ष लक्ष शुभेच्छा!

पत्रकार प्रशांत सुलाखे