लांजा,( वा.) ओले काजूगर सोलण्याच्या मशीनवर शेतकऱ्यांना अनुदान देण्यात यावे असा प्रस्ताव काजू उत्पादक शेतकरी मिथिलेश देसाई यांनी महाराष्ट्र राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांच्याकडे सादर केला आहे. रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सुमारे १० हजार शेतकऱ्यांना या मशीनचा फायदा होणार असून यावर अनुदान देण्यात यावे जेणेकरून शेतकऱ्यांना हे मशीन परवडेल तसा प्रस्ताव ना. सामंत यांना देण्यात आला आहे. 

ओले काजूगर सोलायचे मशीन प्रथमच विकसित करण्यात आले आहे. हे मशीन शेतकऱ्याना व काजू उत्पादकांना ही फायदेशीर ठरणार आहे. ग्रामीण भागातील छोठे मोठे उद्योजक ही त्यामधून आर्थिक उन्नती करू शकतील. व स्वतःचा व्यवसाय उभा करू शकतील. त्यामुळे या मशीनवर अनुदान देण्यात यावे, असा प्रस्ताव काजू उत्पादक शेतकरी मिथिलेश देसाई यांनी उद्योगमंत्री सामंत यांना दिला आहे.